सोशल - 'धर्माच्या नावावर डोकी फोडायला लावणाऱ्यांना भाव देऊ नका'

भारतात वेळोवेळी उडणाऱ्या धार्मिक खटक्यांकडे बोट दाखवत हरभजन सिंगने ट्वीट केलं की, 'क्रोएशिया हा फुटबॉल वर्ल्ड कप फायनल खेळतो तर आपण हिंदू - मुस्लिम खेळतो."
फोटो कॅप्शन,

भारतात वेळोवेळी उडणाऱ्या धार्मिक खटक्यांकडे बोट दाखवत हरभजन सिंगने ट्वीट केलं की, 'क्रोएशिया हा फुटबॉल वर्ल्ड कप फायनल खेळतो तर आपण हिंदू - मुस्लिम खेळतो."

रविवारी मॉस्कोत झालेल्या फिफा वर्ल्ड कप फायनलमध्ये फ्रान्सने क्रोएशियाला 4-2ने नमवलं. पण कोणत्याही जाणकाराच्या फेव्हरेट्समध्ये क्रोएशिया संघा नव्हता. म्हणून अंतिम त्यांनी सामन्यापर्यंत मजल मारणं हे अनेकांसाठी भारावणारं होतं.

त्यांच्या कौतुकात अनेक जण व्यक्त होत असतानाच असं भारताच्या फिरकीपटू हरभजन सिंगने ट्वीट केलं की, 'क्रोएशिया हा फुटबॉल वर्ल्ड कप फायनल खेळतो तर आपण हिंदू - मुस्लिम खेळतो."

त्याचं बोट भारतात वेळोवेळी उडणाऱ्या धार्मिक खटक्यांकडे असावं.

Twitter पोस्टवरून पुढे जा, 1

Twitter पोस्ट समाप्त, 1

यावर बीबीसी मराठीच्या वाचकांना आम्ही त्यांच्या प्रतिक्रिया विचारल्या होत्या. त्यातल्या या काही निवडक संपादित प्रतिक्रिया.

Facebook पोस्टवरून पुढे जा, 1

मजकूर उपलब्ध नाही

Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

Facebook पोस्ट समाप्त, 1

धर्माच्या नावावर डोकी फोडायला लावणाऱ्यांना भाव देऊ नका, असा शुभम पोटफोडे यांनी सल्ला दिला आहे. ते म्हणतात, "नेहमी आपण लोकप्रतिनिधी, राजकीय पक्ष, नेता, संस्था यांना जबाबदार धरतो, पण या दशवताराची साथीदार सामान्य जनता सुद्धा आहे. अशा बाबतीत आपणच ठाम भूमिका घेऊन हिंदू-मुस्लिमांना एकमेकांची डोकी फोडायला लावणाऱ्या लोकांना जर भावच दिला नाही आणि जर समाजाने एकजूट होऊन त्यांच्यावर दबाव बनविला तर त्यांची हिंमतच होणार नाही."

"याला एक जबाबदार गोष्ट आहे, ती म्हणजे आपली धर्माच्या बाबतीत असलेली अज्ञानता. कुणीतरी येत 'धर्म धोक्यात आहे' असं म्हणत आपल्याला भडकावून जातं आणि आपणही मुकाट्याने त्या व्यक्तीचे अनुपालन करतो आणि माणसं मारायला सुरुवात करतो.

वर्ल्ड कप जिंकण्यामागं फ्रान्स फुटबॉल टीमची विविधता आहे, असं विवेक सूर्यवंशी लिहितात. "फ्रान्सच्या टीममध्ये 10 खेळाडूंचे आईवडील हे मुळचे फ्रान्सचे नागरिक नव्हते. बहुतेकजण हे पूर्व आफ्रिकन देशांमधून फ्रान्समध्ये स्थलांतरीत झालेले नागरिक आहेत. त्यांच्यातील एक खेळाडू तर दोन वर्षांचा होता तेव्हा त्यांच्या आईवडिलांनी फ्रान्समध्ये आश्रय घेतला होता."

प्रशांत शिंदे यांनी एक लांबलचक उत्तर देत हरभजन सिंग यांचं मत त्यांना पटल्याचं सांगितलं आहे. ते लिहितात, "सरकारी पातळीवर तर भयानक उदासीनता आहे. आपल्या देशातील क्रीडा मंत्री म्हणजे एखाद्या राजकीय व्यक्तीचं पुर्नवसन असतं. क्रिकेट सामने दूरदर्शनवर लाईव्ह दाखवतात. इतर खेळ आपल्या देशात खेळले जातात का, हेच माहीत नाही."

"135 कोटी लोकसंख्या असलेल्या देशाला फुटबॉल विश्वकपमध्ये आपली टीम पाठवता येत नाही, यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट त्या देशाला कोणती असणार? ऑलिंपिक स्पर्धेत जेवढे खेळ खेळले जातात, त्या खेळांचं प्रतिनिधित्व करणारे खेळाडू आपल्या देशात नाहीत, या पेक्षा मोठा अपमान कोणता असेल?"

क्रोएशियाकडे चांगलं राजकीय नेतृत्व आहे, असं प्राजक्ता सवे यांना वाटतं. "कमीत कमी खेळात तरी ते राजकारण आणत नाही," असं त्या सांगतात.

पुरेशा सोयी-सुविधा आणि योग्य मानधन नसल्यानं आपण खेळात मागे आहोत, असं अमोल सपकाळ यांना वाटतं. ते लिहितात, "भारतात टॅलेंटची अजिबात कमी नाहीये. याचं उत्तम उदाहरण म्हणजे हिमा दासने जिंकलेले गोल्ड मेडल."

"आपल्या देशात सोयी सुविधा उपलब्ध नाहीयेत म्हणूनच आपण क्रिकेट वगळता फुटबॉल आणि ऑलिंपिकमध्ये खूपच मागे आहोत. जर योग्य मानधन आणि सोयी सुविधा खेळाडूला भेटल्या तर भारत जगात सर्वच खेळात सत्ता गाजवेल, यात तीळमात्र शंका नाही," असं ते सांगतात.

फुटबॉलची गुणवैशिष्ठ्यं सांगत बाबा आकडे यांनी फुटबॉल आणि समाजाची तुलना केली आहे.

"फुटबॉल हा खऱ्या अर्थाने सांघिक खेळ आहे. धर्म व जात हे वास्तव असल्याने सांघिक भावना आपल्या देशात खूप कमी आहे. संघाचा गोल करण्यासाठी कुणाला तरी तो चेंडू पास करावा लागतो. पण चेंडू पास करण्याची नियत या देशात दाखवणार कोण? अजून ही 85 टक्के भारतीय मुख्य प्रवाहात नाहीत मग त्यांच्या नावावर झालेला गोल सहन करणार तरी कोण? आणि त्यांना चेंडू पास तरी कोण करणार? म्हणून आपल्या देशात फुटबॉल प्रगती करू शकत नाही."

प्रदीप सहाने लिहितात, "फ्रान्स हा युरोपिअन देश असला तरी त्यांच्या संघातले बहुतेक खेळाडू मूळचे आफ्रिकन वंशांचे आहेत. त्यात काही जण मुस्लीम धर्मीय आहेत. सर्वांची निवड गुणवत्तेनुसारच झाली आहे आणि हे सर्व खेळाडू पूर्ण ताकदीने देशासाठी खेळत होते."

हेही वाचलंत का?

हे पाहिलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
व्हीडिओ कॅप्शन, सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)