ग्रेटर नोएडा : दोन इमारती कोसळल्या; आतापर्यंत 3 मृतदेह बाहेर

  • इकबाल अहमद
  • बीबीसी प्रतिनिधी, ग्रेटर नोएडातल्या शाह बेरी गावातून

राजधानी दिल्लीलगत असलेल्या ग्रेटर नोएडा या उत्तर प्रदेशातल्या शहरात मंगळवारी रात्री दोन इमारती कोसळल्या. त्याखाली अनेक लोक अडकले असण्याची शक्यता आहे. आतापर्यंत तीन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

शाह बेरी या गावात मंगळवारी रात्री आठ ते साडेआठच्या सुमारास झालेल्या या दुर्घटनेत प्रथम एक बिल्डिंग कोसळली. त्यानंतर त्या लगतची दुसरी बिल्डिंगही कोसळली.

दोन्ही इमारतींच्या ढिगाऱ्याखाली नेमके किती लोक अडकले आहेत याच्याविषयी अधिकृत माहिती मिळालेली नाही. परंतु किमान 10 जण अडकले असावेत, अशी भीती अधिकाऱ्यांना वाटते आहे.

Twitter पोस्टवरून पुढे जा, 1

Twitter पोस्ट समाप्त, 1

NDRF चे कमांडंट पी. के. श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार NDRFच्या पाच टीम म्हणजेच 200 जवान मदतकार्यात सहभागी झाले आहेत. आतापर्यंत 2 जणांचे मृतदेह हाती लागले असून ते कामगारांचे असावेत, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली.

कशी झाली दुर्घटना?

एका बांधकाम सुरू असलेली इमारत शेजारच्या दुसऱ्या एका इमारतीवर कोसळल्याने ही दुर्घटना घडली. शेजारच्या इमारतीमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने बीबीसीला सांगितलं की, जुनी बिल्डिंग पाच मजली होती तर नव्याने होत असलेली इमारत 6 मजल्यांची होती. जुन्या इमारतीमध्ये फार लोक राहणारे नव्हते, असंही ते म्हणाले.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही या दुर्घटनेबद्दल ट्विट केलं आहे.

Twitter पोस्टवरून पुढे जा, 2

Twitter पोस्ट समाप्त, 2

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
व्हीडिओ कॅप्शन, सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)