सोशल : 'भारत क्रिकेट वर्ल्डकप जिंकेल पण सरदार बदला तर'

क्रिकेट Image copyright Getty Images

लीड्समध्ये सुरू असलेल्या वन डे आंतरराष्ट्रीय मालिकेतील तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात भारतावर विजय मिळवून इंग्लंडनं ही मालिका 2-1ने जिंकली.

इंग्लंडने टॉस जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारताने इंग्लंडच्या संघाला 257 धावांचं आव्हान दिलं.

इंग्लंडने 44.3 षटकांत 2 बाद 260 धावा करत भारतावर सहज विजय मिळवला. जो रूट आणि कर्णधार इऑन मॉर्गनने दोघांनी नाबाद राहात अनुक्रमे 100 आणि 88 धावांची खेळी केली.

या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीने वाचकांना प्रश्न विचारला की, आताचा परफॉर्मन्स बघता, टीम इंडिया पुढच्या वर्षी होणाऱ्या वर्ल्डकपसाठी टीम इंडिया सज्ज आहे का?

वाचकांच्या या प्रश्नाला मोठा प्रतिसाद दिला. वाचकांच्या काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया इथे देत आहोत.

सुमित खेराडे यांनी दीर्घ प्रतिक्रिया दिली आहे. ते लिहितात, "टीम मॅनेजमेंट हार्दिक पांड्याला जास्त सपोर्ट करतंय. ना तो धड बॉलर आहे ना बॅट्समन. त्याला काहीच जमत नाही. टीम फक्त पहिल्या तीन बॅट्समनवर अवलंबून आहे.

Image copyright Facebook

प्रशिक्षकांबाबत तर न बोललेलच बरं. कोणी केलं यांना प्रशिक्षक. भारताची 20-20 आणि वनडेची टीम पूर्ण वेगळी असावी."

लक्ष्मण बोडके म्हणतात, "भारत वर्ल्डकप जिंकायला समर्थ आहे पण सरदार बदलायला हवा."

Image copyright Facebook

गणेश ननावरे मात्र सकारात्मक आहेत. ते म्हणतात, "आत्ता हरलोय पण विश्वचषक भारतच जिंकणार कारण अपयश ही यशाची पहिली पायरी असते."

विकास पवारां यांनाही तसंच वाटतं. ते लिहितात, "नक्कीच सज्ज आहे आपली टीम. 2019 विश्वचषक आपलाच आहे."

Image copyright Facebook

आपली टीम परफेक्ट नाही, असं अनिल सोहनींना वाटतं. ते म्हणतात, "आपली बॉलिंग कमकुवत आहे. फिल्डिंगही कमजोर आहे. चौथ्या नंबरवर कोण खेळणार हे नक्की नाही. आज तरी धोनीला पर्याय नाही. हार्दिक पांड्या फारसा उपयोगी नाही आणि फास्ट बॉलर्समध्ये फारसा दम नाही."

Image copyright Facebook

"खेळाडू आयपीएलमध्ये जीव तोडून खेळतात पण देशासाठी खेळताना त्यांचा प्रभाव पडत नाही. आयपीएलमध्ये मिळणारे भरमसाठ पैसे हे त्या मागचं कारण असावं," असं मत व्यक्त केलं आहे देवेंद्र म्हात्रे यांनी.

Image copyright Facebook

"धोनी आणि रैनाला बाहेर बसवा. त्यांना फक्त 20-20 मध्ये खेळवा. कारण ते IPLमध्ये चांगले खेळतात. कारण तिथेच त्यांना जास्त पैसे मिळतात," असं अमित लोखंडे यांनी म्हटलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)