भारतातलं सगळ्यात चिमुकलं बाळ बघा
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

व्हीडिओ : तळव्याच्या आकाराचं हे सगळ्यांत चिमुकलं बाळ पाहा

मुळचे छत्तीसगडचे रहिवासी असणाऱ्या सौरभ आणि नितिका यांनी आपल्या बाळाचा जीव वाचावा म्हणून थेट हैदराबाद गाठलं. कारण त्यांचं बाळ दक्षिण आशियातलं सगळ्यांत चिमुकलं बाळ होतं आणि त्याची वाचण्याशी शक्यता कमी असल्याचं सांगण्यात आलं होतं.

चारवेळा गर्भपाताचा अनुभव असल्यामुळे त्यांना धाकधूक होतीच. अवघं 25 आठवडे वय असलेल्या चेरीचं वजन फक्त 325 ग्रॅम होतं. त्यातच तिच्या फुप्फुसात पाणी झालं. 105 दिवस ती व्हेंटिलेटरवर होती. आता तिची तब्येत सुधारली आहे. 400 ग्रॅम पेक्षा कमी वजन असलेल्या बाळांचा जीव वाचण्याचं प्रमाण भारतात फारच कमी आहे. त्यामुळे चेरीच्या जन्मामुळे एक सकारात्मक संदेश समाजात गेला आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)