पैशाची गोष्ट - देशाच्या विकासात महिलांचा सहभाग
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ : पैशाची गोष्ट - देशाच्या तिजोरीला गरज स्त्री शक्तीची

महिला सक्षमीकरणातून आपण देशाच्या आर्थिक विकासाचं उद्दिष्ट साध्य करू शकतो. कसं माहीत आहे?

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अहवालच असं सांगतो की भारतात महिलांच्या नोकरी करण्याचं प्रमाण वाढलं तर 2015पर्यंत देशाच्या जीडीपीमध्ये तब्बल 770 अब्ज डॉलरची भर पडेल. आताच्या तुलनेत ही वाढ 18%नी जास्त असेल.

एक मात्र नमूद करावं लागेल की सध्याची स्थिती बिकट आहे. स्त्री-पुरूष समानतेच्या गप्पा आपण मारतो. पण, प्रत्यक्षात देशाच्या मनुष्यबळात महिलांचा वाटा फक्त 25.5 टक्के आहे.

ग्रामीण भागात महिलांचं काम करण्याचं प्रमाण आणखी कमी आहे. तेव्हा 'पैशाची गोष्ट'च्या निमित्ताने समजून घेऊ की महिलांचा कसा हातभार लागू शकतो?

निवेदक - ऋजुता लुकतुके

निर्माती - सुमिरन प्रीत कौर

लेखक - दिनेश उप्रेती

एडिट - परवाझ लोण

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)