करुणानिधी यांची प्रकृती ढासळली, डॉक्टरांसमोर मोठं 'आव्हान'

हॉस्पिटलबाहेर चाहत्यांची गर्दी
फोटो कॅप्शन,

हॉस्पिटलबाहेर चाहत्यांची गर्दी

द्रविड मुन्नेत्र कळघमचे प्रमुख आणि तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री M करुणानिधी यांच्या प्रकृतीत आज घसरण झाली. 'त्यांच्या मुख्य अवयवांचं काम सुरू ठेवणं आव्हानात्मक आहे' असं हॉस्पिटलने काढलेल्या ताज्या बुलेटिनमध्ये म्हटलं आहे.

94 वर्षांचे करुणानिधी चेन्नईतल्या कावेरी हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. पुढचे 24 तास त्यांच्या तब्येतीवर बारीक नजर ठेवण्यात येईल, असं डॉक्टरांनी सांगितलं.

फोटो कॅप्शन,

मेडिकल बुलेटिन

गेल्या आठवड्यात त्यांच्या तब्येतीत किंचित सुधारणा नोंदवण्यात आली होती, पण अजूनही त्यांचे शेकडो समर्थक हॉस्पिटलबाहेर तळ ठोकून बसले आहेत. कुठलाही अनुचित प्रकार टाळण्यासाठी आधीच तामिळनाडू पोलिसांचा मोठा ताफाही तिथे तैनात करण्यात आला आहे.

फोटो स्रोत, The India Today Group

गेल्या आठवड्यात अनेक बड्या नेत्यांनी करुणानिधी आणि त्यांचा मुलगा MK स्टॅलिन यांची चेन्नईत भेट घेतली. यात उपराष्ट्रपती व्यंकैया नायडू, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि अभिनेता रजनीकांत यांचा समावेश आहे.

फोटो कॅप्शन,

राहुल गांधी, दयानिधी मारन, स्टॅलिन आणि करुणानिधी

करुणानिधी यांचं भारताच्या राजकारणात मोठं स्थान आहे. ते पाच वेळा मुख्यमंत्री आणि 60 वर्षं लोकप्रतिनिधी राहिलेले करुणानिधी स्वतः एकही निवडणूक हरलेले नाहीत.

फोटो कॅप्शन,

प्रफुल्ल पटेल, कनिमोळी, स्टॅलिन आणि शरद पवार

त्यांच्या नेतृत्वाखालील द्रमुक पक्ष 1998 ते 2014 मध्ये केंद्रात सत्तेत सहभागी होता. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील UPAच्या पहिल्या सरकारमध्ये तामिळनाडूतील 12 मंत्री होते. द्रमुककडे दूरसंचारसारखं महत्त्वाचं खातं होतं.

फोटो कॅप्शन,

हॉस्पिटलबाहेर कार्यकर्ते नाच आणि गात असताना. करुणानिधी बरे होऊन बाहेर येतील असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.

याच खात्याअंतर्गत उघड झालेल्या 2G स्पेक्ट्रम घोटाळ्यामुळे तत्कालीन दूरसंचार मंत्री ए. राजा आणि करुणानिधी यांची मुलगी व खासदार कनिमोळी यांना तुरुंगावास झाला होता.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)