सोशल : 'राज्यघटना मान्य नसलेल्या प्रत्येक संघटनेवर बंदी घालावी'

वैभव राउत, सुधना गोंडलेकर

फोटो स्रोत, SANATAN SANSTHA

फोटो कॅप्शन,

वैभव राउत, सुधना गोंडलेकर

सनातन संस्थेशी संबंधित व्यक्तीच्या घरी २२ बाँब सापडले. यापूर्वीही गडकरी रंगायतन आणि मडगाव स्फोट प्रकरणांत या संस्थेशी संबंधित लोकांना अटक झाली आहे.

त्यानंतर सनातन संस्थेवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी काँग्रेस पक्षानं केली आहे.

आम्ही या मागणीविषयी बीबीसी मराठीच्या वाचकांची मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

वाचकांनी दिलेल्या प्रतिक्रियांपैकी या आहेत काही निवडक आणि संपादित प्रतिक्रिया -

फोटो स्रोत, Facebook

तुषार व्हनकाटे यांनी फेसबुकवर म्हटलंय की, "झाकीर नाईक यांच्या इस्लामिक फाउंडेशनवर सरकारनं त्यांच्याकडे कोणताही बाँब न सापडता संशयाच्या आधारावर बंदी घातली, तर मग सनातनवरही बंदी घालावी कारण त्यांच्याकडे बॉम्ब सापडलेत. सर्व धर्मीयांना समान न्याय दिला पाहिजे."

फोटो स्रोत, FACEBOOK

श्रीकांत जुनारकर यांच्या मते, "सामान्य माणसाला फक्त शांतता हवी असते. ज्यावेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो त्यावेळी सामान्यांचंच नुकसान होते. संबंधित कुठल्याही जाती धर्मातील असो त्याला शिक्षा ही व्हायलाच पाहिजे."

फोटो स्रोत, FACEBOOK

"कोणावर बंदी घालायची, हे काँग्रेस पक्ष ठरवणार का? त्यासाठी तपास यंत्रणा आणि न्यायालय समर्थ आहे," असं कुशाल अरविंद राणे म्हणतात.

फोटो स्रोत, FACEBOOK

"संविधान न मानणाऱ्या प्रत्येक संघटनेवर बंदी घालावी. मुस्लिमांना दहशतवादी आणि दलितांना नक्षलवादी बोलणारे लोक या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी केलेल्या देशविरोधी कृतीबाबत बोलतील काय?" असा प्रश्न सुरज कांबळे यांनी विचारला आहे.

फोटो स्रोत, FACEBOOK

"सनातनवर बंदी घालू नये कारण काँग्रेसनेच हिंदूंवर ही परिस्थिती आणली आहे. त्यामुळे काँग्रेसवर बंदी घालायला हवी," असं प्रयाग कुडाळकर यांनी म्हटलं आहे.

फोटो स्रोत, FACEBOOK

तर "सनातन संस्थेनं बनवलेलं बॉम्ब पाकिस्तानी अतिरेक्यांना मारण्यासाठी असतील," असं अभिमन्यी शिंदे यांनी फेसबुकवरील प्रतिक्रियेत म्हटलं आहे.

फोटो स्रोत, FACEBOOK

सुभाष शिवसरण यांनी म्हटलं आहे की, "संभाजी भिडेंना अटक करून चौकशी करायला हवी."

निशांत वाघमारे यांच्या मते, सनातनसोबत भिडेंच्याही संघटनेवर बंदी घालायला हवी.

फोटो स्रोत, TWITTER

"सनातनवर अजूनपर्यंत बंदी का घातली नाही? संघ, बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद यांच्यावरही बंदी घाला," असं आश्विन पवार यांनी ट्विटरवर म्हटलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)