सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा असा बनला: पाहा पहिली झलक

स्टॅच्यू ऑफ युनिटी - गुजरातमध्ये नर्मदेच्या पात्रात उभारण्यात आलेला हा जगातला सर्वांत मोठा पुतळा पूर्ण होऊन तयार आहे. सरदार वल्ल्भभाई पटेल यांच्या 182 मीटर उंचीच्या या पुतळ्याचं उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते 31 ऑक्टोबरला होत आहे.

या स्टॅच्यू ऑफ यूनिटीची उंची न्यूयॉर्कच्या स्टॅच्यू ऑफ ऑफ लिबर्टीच्या जवळपास दुप्पट आहे. सध्या जगातला सर्वांत उंच पुतळा चीनमध्ये आहे. गौतम बुद्धाच्या स्प्रिंग टेंपल बुद्ध नावाच्या या पुतळ्याची उंची 128 मीटर आहे. पण अरबी समुद्रात 2021पर्यंत बनून तयार होणाऱ्या शिवस्मारकाची उंची स्टॅच्यू ऑफ युनिटीपेक्षाही आठ मीटर जास्त असेल.

फोटो स्रोत, Reuters

नर्मदा जिल्ह्यात केवडिया कॉलनी परिसरात उभारण्यात आलेल्या स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या निर्मितीसाठी 2989 कोटींचा खर्च आला आहे.

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन,

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी कामाची पाहणी करताना

या स्मारकात एक संग्रहालयसुद्धा असणार आहे. या संग्रहालयात भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची माहिती दिली जाणार आहे.

फोटो स्रोत, AFP

या पुतळ्याचं काम 2013 मध्ये सुरू झालं होतं. लार्सन अँड टुब्रो या कंपनीला या पुतळ्याचा कंत्राट देण्यात आला होता. प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांनी या पुतळ्याची रचना केली आहे.

फोटो स्रोत, AFP

गुजरातचं मुख्य शहर अहमदाबादपासून साधारण 200 किमी अंतरावर हे स्मारक उभारण्यात आलं आहे.

फोटो स्रोत, AFP

जवळपास 2,500 कर्मचारी या स्मारकाच्या निर्मितीचं काम केलं आहेत. त्यात काही चीनी कामगारांचासुद्धा समावेश आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)