विराट कोहलीचे वनडेत सर्वांत जलद 10 हजार रन : 'रनमशीन'चा नवा विक्रम

विराट कोहली Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा विराट कोहलीच्या खेळातलं सातत्य अद्भुत आहे.

'रन-मशीन' म्हणून क्रिकेट विश्वात प्रसिद्ध विराट कोहलीने वनडेत 10,000 धावांचा टप्पा पूर्ण करत शिरपेचात आणखी एका मानाचा तुरा रोवला. वनडे क्रिकेटमध्ये 10,000 रन्सचा पल्ला गाठणारा विराट एकूण 13वा तर 5वा भारतीय बॅट्समन ठरला आहे. विशेष म्हणजे विराटने केवळ 205 वनडे इनिंग्जमध्ये हा टप्पा पूर्ण केला. सगळ्यांत कमी मॅचेसमध्ये 10,000 रन करण्याचा विक्रम आता विराट कोहलीच्या नावावर आहे.

सचिन तेंडुलकरने 259 इनिंग्जमध्ये 10,000 धावांचा टप्पा गाठला होता. अद्भुत सातत्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या विराटने केवळ 213 मॅचमध्येच हा विक्रमी टप्पा गाठला.

विराटने 18 ऑगस्ट 2008 रोजी श्रीलंकेविरुद्ध दम्बुला येथे वनडे पदार्पण केलं होतं. अवघ्या दहा वर्षात विराटने हा जादुई आकडा पार गाठला. विराटच्या आधी सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड, महेंद्रसिंग धोनी या भारतीय बॅट्समननी हा टप्पा पूर्ण केला होता.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा विराट कोहली

वनडेत 10,000 धावांचा टप्पा गाठणारे बॅट्समन

बॅट्समन मॅचेस इनिंग्ज रन्स सर्वाधिक स्कोअर अॅव्हरेज शतकं अर्धशतकं
सचिन तेंडुलकर 463 452 18426 200* 44.83 49 96
कुमार संगकारा 404 380 14234 169 41.98 25 93
रिकी पॉन्टिंग 375 365 13704 164 42.03 30 82
सनथ जयसूर्या 445 433 13430 189 32.36 28 68
महेला जयवर्धने 448 418 12650 144 33.37 19 77
इंझमाम उल हक 378 350 11739 137* 39.52 10 83
जॅक कॅलिस 328 314 11579 139 44.36 17 86
सौरव गांगुली 311 300 11363 183 41.02 22 72
राहुल द्रविड 344 318 10889 153 39.16 12 83
ब्रायन लारा 299 289 10405 169 40.48 19 63
तिलकरत्ने दिलशान 330 303 10290 161* 39.27 22 47
महेंद्रसिंग धोनी 328 278 10123 183* 50.61 10 67

वर्षनिहाय कामगिरी

विराट कोहलीच्या वर्षनिहाय कामगिरीवर एक नजर टाकूया

वर्ष मॅचेस रन्स अव्हरेज शतकं अर्धशतक
2008 5 159 31.80 0 1
2009 10 325 54.16 1 2
2010 25 995 47.38 3 7
2011 34 1381 47.62 4 8
2012 17 1026 68.40 5 3
2013 34 1268 52.83 4 7
2014 21 1054 58.55 4 5
2015 20 623 36.64 2 1
2016 10 739 92.37 3 4
2017 26 1460 76.84 6 7
2018 11* 943* 134.71 4 4

विविध संघाविरुद्धची कामगिरी

विविध संघाविरुद्ध विराट कोहलीने बजावलेल्या कामगिरीवर एक दृष्टिक्षेप:

संघ मॅचेस रन्स अॅव्हरेज शतकं अर्धशतकं
अफगाणिस्तान 1 - - - -
ऑस्ट्रेलिया 28 1182 51.39 5 5
बांगलादेश 11 654 81.75 3 3
इंग्लंड 29 1112 44.48 3 6
आयर्लंड 2 78 78.00 0 0
नेदरलँड्स 1 12 12.00 0 0
न्यूझीलंड 19 1154 72.12 5 6
पाकिस्तान 12 459 45.90 2 1
द.आफ्रिका 26 1269 66.78 4 6
श्रीलंका 46 2186 59.08 8 11
यूएई 1 33 - 0 0
वेस्टइंडिज 29 1581 65.87 5 10
झिम्बाब्वे 8 253 50.60 1 1

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)