देशात महाराष्ट्र भरतो सर्वाधिक आयकर, मग दिल्ली, कर्नाटकचा नंबर

समजा गेल्या आर्थिक वर्षांत सगळा करभरणा 100 रुपये झाली असेल, तर त्यापैकी 39 रुपये एकट्या महाराष्टानं दिले आहेत. दिल्लीने 13 तर उत्तर प्रदेशने अडीच रुपये दिलेत.
फोटो कॅप्शन,

समजा गेल्या आर्थिक वर्षांत सगळा करभरणा 100 रुपये झाली असेल, तर त्यापैकी 39 रुपये एकट्या महाराष्टानं दिले आहेत. दिल्लीने 13 तर उत्तर प्रदेशने अडीच रुपये दिलेत.

देशात कर भरणाऱ्यांची संख्या सर्वाधिक महाराष्ट्रात आहे, असं केन्द्रीय प्रत्यक्ष कर बोर्डने (CBDT) नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीतून पुढे आलं आहे.

2017-18 वर्षांत एकट्या महाराष्ट्राने 3,84,277.53 कोटी रुपये कर भरला आहे, तर 1,36,934.88 कोटी रुपये कर भरत दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर आहे.

सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, समजा गेल्या आर्थिक वर्षांत सगळा करभरणा 100 रुपये झाली असेल, तर मग त्यापैकी 39 रुपये एकट्या महाराष्टानं दिले आहेत. तर दिल्लीने 13 रुपये दिलेत आणि सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशने 100 रुपयांपैकी केवळ 2.52 रुपये कर भरला.

अजून एक विशेष बाब म्हणजे, गेल्या तीन वर्षांत देशात कोट्यधीशांच्या संख्येत 68 टक्के वाढ झाली.

2013-14मध्ये एकूण 48,416 लोकांनी त्यांचं उत्पन्न हे एक कोटींपेक्षा जास्त असल्याचं जाहीर केलं होतं. तर हा आकडा फुगत आता 81,344 पर्यंत पोहोचला आहे.

कर

मात्र 2016-17 या वर्षांत उत्तर प्रदेशातून 29309 कोटी रुपये कर आला तर 2017-18 साली हा आकडा घसरून 23,515 कोटी रुपये झाला आहे.

2016-17 या आर्थिक वर्षात इशान्येकडील राज्यातून कर भरण्यात 46 टक्के घट झाली आहे. मिझोराममधून सगळ्यांत कमी कर भरला जातो.

पण गेल्या चार आर्थिक वर्षांची आकडेवारी पाहिल्यास कर भरणाऱ्यांची संख्या 3.79 कोटींवरून 6.85 कोटींवर गेली आहे, म्हणजे तब्बल 80 टक्के वाढ.

निम्मे डॉक्टर भरेना कर

2017-18 या आर्थिक वर्षांतली आकडेवारी पाहिल्यास 10 पैकी 5 डॉक्टर कर भरत नसल्याचं लक्षात येतं.

वकील आणि डॉक्टर

देशातली डॉक्टरांची संख्या आहे 9 लाखांहून जास्त आहे. पण CBDTच्या आकडेवारीनुसार फक्त 4,21,920 डॉक्टरांचा समावेश करदात्यांच्या यादीत आहे. म्हणजे देशातील जवळजवळ निम्मे डॉक्टर्स करदात्यांच्या यादीत नाहीत.

कर

केवळ डॉक्टरच नव्हे तर वकील मंडळीही कर कमी भरतात. 13 लाख वकिलांपैकी केवळ 2.6 लाख वकील कर भरतात. याचा अर्थ जवळजवळ 75 टक्के वकील कर भरत नाहीत.

कर

नोकरदारांना कराची जास्त झळ

नोकरदार वर्गाचं चित्रं मात्र याउलट आहे. गेल्या तीन आर्थिक वर्षांत कर भरणाऱ्या नोकरदारांची संख्या 1.70 कोटींवरून 2.33 कोटी झाली आहे. म्हणजे एकूण यामध्ये 37 टक्के वाढ झाली आहे.

देशातील एकूण करात 19 टक्क्यांनी वाढ झाली आहे. व्यवसाय करणाऱ्या करदात्यांची संख्या 1.95 कोटींवरून 2.33 कोटी झाली आहे. पण नोकरदार आणि व्यावसायिक वर्गाची तुलना केली तर नोकरदार वर्गाला कराची जास्त झळ बसल्याचं दिसतं.

कर

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)