दुष्काळ जाहीर झालेले 26 जिल्हे आणि 151 तालुक्यांची संपूर्ण यादी इथे पाहा

दुष्काळ Image copyright Getty Images/HT

राज्यातल्या 26 जिल्ह्यांमध्ये असलेल्या 151 तालुक्यांमध्ये राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. त्यांपैकी 112 तालुक्यांमध्ये गंभीर दुष्काळी परिस्थिती असून 39 तालुक्यांमध्ये मध्यम दुष्काळी परिस्थिती आहे.

विशेष म्हणजे पंढरपूर, अक्कलकोट, नेवासा, पैठण, शेगाव, आंबेजोगाई, परळी आणि तुळजापूर अशा धार्मिकदृष्ट्या महत्त्वाच्या तालुक्यांचाही या यादीत समावेश आहे.

जिल्हा गंभीर दुष्काळ मध्यम दुष्काळ एकूण तालुके
पुणे - आंबेगाव, पुरंदर-सासवड, वेल्हे, बारामती, दौंड, इंदापूर, शिरूर-घोडनंदी 7
सांगली जत, कवठेमहांकाळ, खानापूर-विटा, आटपाडी, तासगाव - 5
सातारा माण-दहीवडी कोरेगाव, फलटण 3
सोलापूर करमाळा, माढा, माळशिरस, मंगळवेढा, पंढरपूर, सांगोला, अक्कलकोट, मोहोळ, दक्षिण सोलापूर - 9
पालघर पालघर, तलासरी, विक्रमगड - 3
धुळे धुळे, सिंदखेड शिरपूर 3
जळगाव अमळनेर, भडगाव, भुसावळ, बोदवड, चाळीसगाव, चोपडा, जळगाव, जामनेर, मुक्ताईनगर, पाचोरा, पारोळा, रावेर, यावल - 13
नंदुरबार नंदुरबार, नवापूर, शहादा तळोदे 4
नाशिक बागलान, मालेगाव, नांदगाव, सिन्नर देवळा, इगतपुरी, नाशिक, चांदवड 8
अहमदनगर कर्जत, अहमदनगर, नेवासा, पारनेर, पाथर्डी, रहाता, राहुरी, संगमनेर, शेवगाव, श्रीगोंदा, जामखेड - 11
औरंगाबाद औरंगाबाद, गंगापूर, खुल्ताबाद, पैठण, फुलंब्री, सिल्लोड, सोयगाव, वैजापूर, कन्नड - 9
बीड आष्टी, बीड, धारूर, गेवराई, माजलगाव, शिरूर (कासार), वडवणी, आंबेजोगाई, केज, परळी, पाटोदा - 11
जालना अंबड, बदनापूर, भोकरदन, घनसावंगी, जाफ्राबाद, जालना, परतूर - 7
नांदेड मुखेड, देगलूर उमरी 3
उस्मानाबाद लोहारा, कळंब, उस्मानाबाद, परांडा, तुळजापूर, वाशी, भूम - 7
परभणी मनवथ, पाथरी, सोनपेठ, पालम, परभणी, सेलू - 6
हिंगोली हिंगोली, सेनगाव कळमनुरी 3
लातूर - शिरूर, अनंतपाळ 1
अकोला - बाळापूर, बार्शीटाकळी, मूर्तिजापूर, तेल्हारा, अकोला 5
अमरावती मोर्शी अचलपूर, चिखलदरा, वरूड, अंजनगाव सुर्जी 5
बुलडाणा खामगाव, लोणार, नांदुरा, संग्रामपूर, शेगाव, मलकापूर, सिंदखेड राजा मोताळा 8
वाशिम - रिसोड 1
यवतमाळ बाभुळगाव, दारव्हा, कळंब, महागाव, उमरखेड, राळेगाव केलापूर, मारेगाव, यवतमाळ 9
चंद्रपूर चिमूर ब्रम्हपुरी, नागाभिड, राजुरा, सिंदेवाही 5
नागपूर काटोल, कळमेश्वर नरखेड 3
वर्धा - आष्टी, कारंजा 2
एकूण जिल्हे 26 गंभीर दुष्काळी - 112 मध्यम दुष्काळी - 39 एकूण दुष्काळी - 151

हेही वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)