'नरेंद्र मोदींना फक्त संघाने सांगितलेलाच इतिहास माहीत आहे' : 'होऊ द्या चर्चा'त टीका

मोदी

फोटो स्रोत, PMO INDIA

सरदार पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण आणि यापूर्वी आझाद हिंद सेनेच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला लक्ष करत नेहरू आणि गांधी घरण्यांसाठी इतर नेत्यांना डावललं अशी टीका केली होती. मोदी यांच्या या टीकेवर बीबीसी मराठीने 'होऊ द्या चर्चा'मध्ये वाचकांना त्यांची मत विचारली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फक्त संघाने सांगितलेलाच इतिहास माहिती आहे, त्यांना दुसरा इतिहास माहितीच नाही, अशी टीका काही वाचकांनी केली तर काही वाचकांनी मोदी यांनी केलेली टीका योग्यच असल्याचं म्हटलं आहे.

आकाश भालेराव म्हणतात, "महिलांना पुरुषांप्रमाणे समान अधिकार मिळवून देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल सादर केलं होतं. त्याला सरदार पटेल यांनी विरोध केला होता. जर नेहरूंच्या जागी पटेल पंतप्रधान झाले असते तर महिलांना समान अधिकार मिळाला असता का?"

फोटो स्रोत, Facebook

"मोदींना फक्त संघाने सांगितलेला इतिहासच माहीत आहे. दुसऱ्या बाजूची त्यांना काहीच माहिती नाही," असंही ते म्हणतात.

फोटो स्रोत, Facebook

"दुर्लक्ष तर झालंच आहे. काँग्रेसच्या काळात फक्त आणि फक्त नेहरू घराण्यालाच प्राधान्य दिलं गेलं," असं मत आकाश मनकानी यांनी व्यक्त केलं आहे.

"इतिहास तो इतिहास, यावर लोकांची दिशाभूल करून मत मिळण्याचा हा धंदा बंद झाला पाहिजे, "असं मत महादेव लाते यांनी व्यक्त केलं आहे.

फोटो स्रोत, Facebook

"जर पटेल बोस आणि आंबेडकर यांचे नातलग काही बोलत नाही, तर तुम्ही विनाकारण का त्रास करून घेता?", असा प्रश्न अजय देशमुख यांनी विचारला आहे.

फोटो स्रोत, Facebook

वृशाली प्रजक्त म्हणतात, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे बोलण्यासारखं काहीच उरलं नाहीये, त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करा."

फोटो स्रोत, Facebook

"काँग्रेसने केवळ दुर्लक्षच केलं नाही तर, या तिन्ही महान नेत्यांकडे दुलर्क्ष करून मोठा अनर्थ केला," असं मत बाळीश गाडे यांनी व्यक्त केलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)