...अशी सुरू झाली कपिल आणि गिन्नीची लव्ह स्टोरी

कपिल आणि गिन्नीची लॅव्ह स्टोरी Image copyright Instagram/Kapil Sharma

एकीकडे ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांच्या विवाहाची सगळीकडेच जोरदार चर्चा सुरू असताना बॉलिवुड अभिनेता आणि कॉमेडियन कपिल शर्मादेखील विवाहबंधनात अडकला आहे. कपिलनं ट्विटरवर लग्नानंतरचा फोटो शेअर केला.

कपिलनं आपली गर्लफ्रेंड गिन्नी छत्रत हिच्याची विवाहगाठ बांधली. ते दोघं अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते.

या जोडीने सोशल मीडियावरुन आपल्या नात्याची जाहीर कबुली दिली होती.

१२ डिसेबंरला ही जोडी लग्नाच्या बेडीत अडकली. या लग्नात त्याचे जवळचे नातेवाईक आणि खास मित्रमंडळी उपस्थित होती.

"२००५ साली गिन्नीच्या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची ऑडिशन घेण्यासाठी गेलो असताना आमची पहिल्यांदा भेट झाली," असं कपिल सांगतो. तेव्हा कपिलने नाटकांचं दिग्दर्शन सुरू केलं होतं.

"मी गिद्देच्या (पंजाबचं पारंपारिक नृत्य) ऑडिशनसाठी गेले होते," असं गिन्नी सांगते. पण कपिलला गिन्नीचं काम इतकं आवडलं की त्याने तिच्यावरच मुलींच्या ऑडिशन्स जबाबदारी सोपवली आणि इथूनच त्यांच्या नात्याला सुरुवात झाली.

कपिलने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सांगितलं की गिन्नीच्या वडिलांनी सुरुवातीला त्यांच्या लग्नाला नकार दिला होता.

Image copyright FACEBOOK/KAPIL SHARMA

त्यावेळी कपिलच्या करीअरची नुकतीच सुरुवात झाली होती. पण तेव्हापासून आतापर्यंत गिन्नीने त्याची वाट पाहिली आणि कठीण परिस्थितही खंबीरपणे त्याच्यासोबत राहिली.

गिन्नीने आपल्या इन्स्टाग्रामवर लिहिलं आहे की, "कपिल तिची खूप काळजी घेतो. त्याच्या सारखा दुसरा कोणीच नाही."

बच्चन यांचा कपिलला कानमंत्र

या दोघांच्या रिलेशनची चर्चा अनेक वर्षांपासून सुरू आहे. कपिलने अनेकवेळा गिन्नीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

नुकताच एक व्हीडिओसुद्धा व्हायरल झाला होता ज्यात अभिनेत्री रेखाने कपिल शर्माला मिठी मारत 'शादी मुबारक' असं म्हणत लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

तर एका कार्यक्रमात बॉलिवुडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांनी कपिलला लग्नानंतरच्या आयुष्यासाठी एक सल्ला दिला होता.

कपिल शर्मा आणि त्याचा मित्र रवी कालरा 'केबीसी'च्या शोमध्ये गेला होता. तेव्हा अमिताभ बच्चन त्याला म्हणाले विचारलं, "असं ऐकलं आहे की तू लग्न करणार आहेस?"

Image copyright facebook.com/Kapilsharma

हे ऐकताच कपिलने अमिताभ बच्चन यांच्या हातात पत्रिका ठेवत त्यांना लग्नासाठी आमंत्रित केलं. त्यानंतर कपिलला अमिताभ बच्चन यांनी शुभेच्छा दिल्या. शिवाय "लग्नानंतर पत्नीशी काहीही बोलण्याआधी सॉरी म्हणून मोकळा हो," असा कानमंत्रही दिला.

कपिलच्या करिअरमधील चढ-उतार

कपिलने दहा वर्षे रंगभूमीवर काम केलं आहे. कपिलने २००७ला लाफ्टर चॅलेंज-३ जिंकत इंडस्ट्रीत पदार्पण केलं.

'कॉमेडी सर्कस'मध्ये सहभागी झाल्यानंतर लोक कपिलला ओळखू लागले आणि त्याच्या कलागुणांचं कौतुक होऊ लागलं. २०१३मध्ये त्याचा स्वत:चा शो 'कॉमेडी नाईट्स विथ कपिल' घेऊन तो प्रेक्षकांच्या भेटीस आला. विनोदबुद्धी आणि वन लाइनर पंचेसमुळे कपिलच नाव घराघरांत पोहचलं.

सलग 3 वर्षं हा शो नंबर वन होता. बॉलिवुडचे अनेक सेलेब्रिटी या शोवर फिल्मच्या प्रमोशनसाठी यायची.

त्यानंतर २०१५मध्ये कपिलने 'किस-किस को प्यार करू' या सिनेमात भूमिका केली.

२०१६मध्ये कलर्स चॅनलसोबत झालेल्या वादनंतर कपिलचा शो बंद झाला. त्यानंतर त्याने सोनी चॅनलसोबत 'द कपिल शर्मा शो' सुरू केला. चम्पू शर्मा, डॉक्टर मशहूर गुलाटी, रिंकू देवी आणि नानी ही पात्र पात्र लोकांच्या पसंतीला उतरली. पण विविध कारणांमुळे कपिलसाठी २०१७-१८ हे वर्ष चढ-उताराचं ठरलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)