रजनीकांतच्या '2.0' सिनेमाला मोबाईल कंपन्यांचा विरोध का - #5मोठ्याबातम्या

2.0 Image copyright Facebook / 2.0
प्रतिमा मथळा 2.0

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1) रजनीकांतच्या 2.0 सिनेमाला मोबाईल कंपन्यांचा विरोध

रजनीकांत आणि अक्षय कुमार यांचा 2.0 सिनेमा विज्ञानविरोधी असल्याचा दावा करत Cellular Association of India (COAI)ने सेन्सर बोर्ड तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे तक्रार केली आहे. सिनेमात मोबाईल फोन्स, त्याचे टॉवर्स आणि मोबाईल सेवेचा नकारात्मक प्रचार केला आहे, असं COAIने एका निवेदनात नमूद केलं आहे, अशी बातमी द इकॉनॉमिक टाईम्सने दिली आहे.

सिनेमाच्या ट्रेलरमध्ये मोबाइल फोन आणि मोबाइल टॉवर्सचा मनुष्य, पक्षी आणि जनावरांवर नकारात्मक परिणाम होत असल्याचं दाखवलं आहे, असं COAIचं म्हणणं आहे.

2.0 सिनेमा गुरुवारी (29 नोव्हें) भारतात आणि जगभरात रिलीज होत आहे. पण असोशिएशने या सिनेमाचं सर्टिफिकेट मागं घेण्याची सेन्सर बोर्डला विनंती केली आहे.

2) महाराष्ट्र पोलिसांवरील हल्ल्यांत वाढ

गेल्या काही वर्षांत पोलिसांवरील हल्ल्यांत दिवसेंदिवस वाढ होत असल्याची बाब राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (CID) आकडेवारीवरून स्पष्ट झाली आहे. लोकसत्ताने ही बातमी दिली आहे.

CIDच्या 2016च्या गुन्हे अहवालानुसार, 2015 मध्ये एकूण 370 पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ले करण्यात आले होते. तर 2016मध्ये 428 पोलिसांवर हल्ले करण्यात आले. या हल्ल्यांमध्ये 2016मध्ये 56 पोलिसांचा मृत्यू झाला होता.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा फाईल फोटो

सर्वाधिक 11 पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू चंद्रपूर जिल्ह्यात झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी होऊन चार वर्षं झाली आहेत. त्यानंतर तिथे पोलिसांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे. मद्यतस्करी आणि अवैध दारू विक्री, ही त्यामागची प्रमुख कारणं असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे.

3) ताडोबातून जाणार नवीन रस्ते?

केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतंच एकट्या चंद्रपूरमध्येच 576 किमी लांबीच्या रस्ते बांधणी दुरुस्तीला हिरवा कंदील दिला आहे. त्यापैकी 100 किमी रस्ते हे वाघांच्या अभयारण्यातून जाणार आहेत.

त्यामुळे जर ताडोबा व्याघ्र अभयरण्यात नवीन रस्ते प्रकल्पांना मंजुरी मिळाली तर वाघांचं अस्तित्व धोक्यात येऊ शकतं, अशी बातमी द टाइम्स ऑफ इंडियाने देली आहे.

Image copyright Getty Images

जूनमध्ये Wildlife Institute of Indiaने सादर केलेल्या अहवालात चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली नागपूर आणि यवतमाळच्या पट्ट्यात किमान 200 वाघांची वस्ती असल्याची माहिती दिली होती.

4) मध्य प्रदेश मध्ये 75 टक्के तर मिझोराममध्ये 80 टक्के मतदान

बुधवारी झालेल्या मतदानासाठी मध्य प्रदेशात 75 टक्के लोक तर मिझोरममध्ये 80 टक्के लोकंनी हजेरी लावल्याची बातमी नवभारत टाइम्स आणि NDTVने दिली आहे.

मतदान झाल्यानंतर संबंधित राज्य निवडणूक आयोगाने टक्केवारी जाहीर केली. मध्यप्रदेश मध्ये 230 जागांसाठी तर मिझोरममध्ये 40 जागांसाठी मतदान झालं. दोन्ही ठिकाणी शांततेत मतदान झाल्याचं आयोगाने सांगितलं.

Image copyright Getty Images

मिझोरममध्ये रात्री 9 वाजेर्पंत मतदान झालं. मिझोरममधल्या ब्रू समुदायासाठी त्रिपुरा-मिझोरम सीमेवर विशेष मतदान केंद्रं उभारण्यात आले होते. ब्रू समुदायाचे 12 हजार मतदान मिझोरमच्या निवडणुकीत महत्त्वाचे ठरणार आहेत.

5) 30 हजार शिक्षक आणि शिक्षकेतरांना मिळणार अनुदान

सुमारे 30 हजार शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिलासा देत राज्य सरकारने गेल्या काही वर्षांपासून शासकीय अनुदानासाठी रखडलेल्या राज्यातील 2,907 शाळा आणि 4,319 तुकड्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला असल्याची बातमी महाराष्ट्र टाइम्सने दिली आहे.

"अशा शाळा आणि तुकड्यांना द्याव्या लागणाऱ्या अनुदानासाठी 275 कोटी रुपयांचा निधी अपेक्षित असून, दोन महिन्यांत सर्व प्रशासकीय कार्यवाही करून आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात या निधीची तरतूद करण्यात येईल," असे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधानपरिषदेत दिलेल्या निवेदनात केली आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा प्रतिकात्मक

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि शिक्षणमंत्री तावडे यांच्या उपस्थितीत शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांतील आमदारांची बैठक विधानभवनात झाली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)

मोठ्या बातम्या

राज्यात कोरोनाचे 2436 नवीन रुग्ण, कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 52,667

अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण, अॅब्युलन्सने मुंबईला रवाना

नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यात संघर्षाला नेमकी सुरुवात केव्हा झाली?

सोनू सूद : पडद्यावरचा व्हिलन बनला खऱ्या आयुष्यातला हिरो

‘युपी बिहारचे मजूर मराठी माणसाचं कौतुक करताना महाराष्ट्राचा अभिमान वाटतो.'

राज ठाकरे - योगी आदित्यनाथ यांच्यात महाराष्ट्रातील स्थलांतरित मजुरांवरून जुंपली

मजुरांसाठीच्या रेल्वेवरून केंद्र वि. राज्य सरकारमध्ये असा रंगला ‘सामना’

आजारी उंटांमधून पसरणाऱ्या व्हायरसमुळे दक्षिण कोरिया कोरोनापासून सुरक्षित?

चीनमध्ये तस्करी होणाऱ्या खवले मांजराला कोकणात असं वाचवलं जातंय