2019मध्ये शरद पवार पंतप्रधान होणार?

शरद पवार Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा शरद पवार

लोकसभा निवडणूक जवळ आली की महाराष्ट्रात आणि देशात, 'राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार पंतप्रधान होणार का?' हा प्रश्न उपस्थित व्हायला सुरुवात होते. राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात गेली ६ दशकं कार्यरत असणारे शरद पवार पंतप्रधान पदाला तीन वेळा स्पर्शून गेले आहेत असं राजकीय निरीक्षक मानतात. त्यांना पंतप्रधान पदानं नेमकी कधी आणि कशी हुलकावणी दिली हे आपण या व्हीडिओतून जाणून घेऊ या.

१९९१ साली राजीव गांधी यांच्या मृत्यूनंतर पहिल्यांदा, १९९९मध्ये अटलबिहारी वाजपेयींचं अल्पमतातलं सरकार पडल्यानंतर एकदा आणि २००९च्या निवडणूकीनंतर शरद पवारांना पंतप्रधान पदावर विराजमान होण्याची संधी होती असं राजकीय विश्लेषक मानतात. पण, या प्रत्येक वेळी घडलेल्या नाट्यमय घडामोडींमुळे त्यांची संधी हुकल्याचं बोललं जातं.

त्यावेळी नेमकं काय घडलं असेल हे तुम्हाला खाली दिलेल्या बीबीसी विश्व बुलेटीनच्या युट्यूब लिंकमध्ये पाहायला मिळेल. तसंच, हा व्हीडिओ बीबीसी न्यूज मराठीच्या युट्यूब चॅनलवरही पाहायला मिळेल.

तुम्ही बीबीसी विश्व बुलेटीन सोमवार ते शुक्रवार दररोज संध्याकाळी ७.०० वाजता मोबाईलवर जिओ टीव्ही अॅपवर पाहू शकता.

बीबीसी विश्व बुलेटीन पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)