जोरदार थंडी, तिखटजाळाची मिसळ आणि नवा विक्रम

मिसळ Image copyright BBC/Swati Patil Rajgolkar
प्रतिमा मथळा कोल्हापुरी मिसळ

खाद्यसंस्कृती जगतात कोल्हापूर जिल्ह्याची एक वेगळी ओळख आहे. ही ओळख आज पुन्हा एकदा अधोरेखित झाली. निमित्त होतं मिसळ खाण्याच्या उपक्रमाचं.

Image copyright BBC/Swati Patil Rajgolkar
प्रतिमा मथळा जोरदार थंडी आणि तिखटजाळाची मिसळ हे समीकरण कोल्हापूरकरांना आवडलं.

'Continental of Hotel Management' च्या वतीनं शेफ दिग्विजय भोसले यांनी बनवलेल्या कोल्हापूरी मिसळवर अनेकांनी ताव मारला.

Image copyright BBC/Swati Patil Rajgolkar
प्रतिमा मथळा मिसळीचा रटरटणारा रस्सा

सकाळच्या गुलाबी थंडीत, कोवळ्या उन्हात आबालवृद्ध मिसळ खाण्यासाठी रंकाळा तलावाकाठी असलेल्या पदपथ उद्यानात आवर्जून आले होते.

या चविष्ट उपक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ World Record मध्ये करण्यात आली आहे.

Image copyright BBC/Swati Patil Rajgolkar
प्रतिमा मथळा सर्व वयोगटातल्या व्यक्तींनी मिसळीवर ताव मारला

कोल्हापूर म्हटलं की खवय्यांच्या डोळ्यासमोर येतो तो तांबडा पांढरा रस्सा, कोल्हापुरी गूळ, कोल्हापुरी मटण. त्यातही मिसळ म्हटलं तर तोंडाला पाणी सुटलं नाही तरच नवल.

Image copyright BBC/Swati Patil Rajgolkar
प्रतिमा मथळा तरुण मंडळी मिसळीचा आस्वाद घेताना

खवय्यांची ही आवडीची कोल्हापुरी मिसळ world record मध्ये गेलीय. कारण म्हणजे 2500 हून अधिक लोकांनी मिसळ खाण्याचा हा उपक्रम...

पर्यावरण पूरक ताटामध्ये मिसळचा चिवडा, कांदा, कोथिंबीर, लिंबू, लालभडक कट, आणि ब्रेड slice असा भन्नाट बेत रविवारी पूर्ण झाला. मिसळ खाण्याच्या या उपक्रमात कोल्हापूरकर हौसेने सहभागी झाले आणि त्यांनी झणझणीत मिसळीवर ताव मारला.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)