सोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरणी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता

सोहराबुद्दीन शेख आणि त्यांची पत्नी कौसरबी यांना 2005 मध्ये कथित एन्काऊंटरमध्ये मारण्यात आलं.
सोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरणी मुंबईच्या विशेष सीबीआय कोर्टानं सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.
सर्व 22 आरोपींना कोर्टानं पुराव्यांअभावी निर्दोष मुक्त केलं आहे. हा निकाल सुनावताना कोर्टानं मात्र हतबलता व्यक्त केली आहे.
"तीन मृतांच्या नातेवाईकांबाबत मला दुःख वाटतं, पण मी असहाय्य आहे. कोर्ट पुराव्यांच्या आधारावर चालतं. दुर्दैवानं पुरावे गायब आहेत," असं न्यायाधिशांनी निकाल सुनावताना म्हटलं आहे.
तर कोर्टाच्या निर्णयावर खूश नसल्याचं सोहराबुद्दीन यांचे भाऊ रबाबुद्दीन यांनी सांगतिलं आहे. या निकालाला उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी न्यायाधीशांच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
तुलसी प्रजापती चकमक प्रकरण सत्य असल्याचं कोर्टानं मानलं आहे, तर सोहराबुद्दीन चकमकीचे पुरेसे पुरावे नसल्याचं कोर्टानं म्हटलं आहे, अशी माहिती बचाव पक्षाचे वकील वहाब खान यांनी दिली आहे.
हे संपूर्ण प्रकरण काय आहे हे वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)