राष्ट्रीय गणित दिवस: भेटा भारतातील पाच महान गणितज्ज्ञांना

रामानुजन

फोटो स्रोत, Youtube

फोटो कॅप्शन,

श्रीनिवास रामानुजन

गणित विषयाने अनेकांना शाळेत धडकी भरवली होती. मात्र आज राष्ट्रीय गणित दिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया काही अशा भारतीयांना ज्यांना गणिताची कधीच भीती वाटली नाही. उलट त्यांनी गणिताशी मैत्री केली, गणिताच्या क्षेत्रात मुशाफिरी केली आणि या क्षेत्रात नवीन आयाम प्रस्थापित केले.

श्रीनिवास रामानुजन

रामानुजन जेव्हा इंग्रजी विषयात नापास झाले तेव्हा त्यांनी शाळा सोडली. त्यानंतर ते गणित शिकले आणि आपली ओळख प्रस्थापित केली. त्यांनी गणितात 120 प्रमेय निर्माण केले. त्यासाठी केंब्रिज विद्यापीठाने त्यांना आमंत्रण धाडलं.

त्यांनी Analytical theory of numbers, Eliptical function आणि Infinite series या विषयांवर अभ्यास केला.

त्यांचाच जन्मदिन राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा केला जातो.

आर्यभट्ट

भारताचे सगळ्यांत पहिले गणितज्ज्ञ आर्यभटट् यांना मानलं जातं. असं म्हणतात की पाचव्या शतकात पृथ्वी गोल आहे, हा सिद्धांत त्यांनी मांडला आहे. सूर्याच्या चारी बाजूंना प्रदक्षिणा घालतोय. असं करण्यासाठी त्यांना 365 दिवसांचा वेळ लागतो.

फोटो स्रोत, Newsonair.com

भारताने जगाला शून्य दिला, ती आर्यभट्ट यांच्याच कामाची कृपा. त्यांच्या या योगदानामुळेच भारताच्या पहिल्या उपग्रहाला त्यांचं नाव देण्यात आलं होतं.

शकुंतला देवी

शकुंतला देवी या भारतातल्या सगळ्यांत प्रसिद्ध महिला गणितज्ञ मानल्या जातात. त्यांना मानवी कॉम्प्युटरही म्हटलं जायचं, कारण त्या कोणत्याही कॅल्क्युटरविना आकडेमोड करायच्या.

त्या सहा वर्षांच्या होत्या, तेव्हापासूनच त्यांच्या प्रतिभेचा प्रकाश भारताच्या विविध विद्यापीठात पडायला सुरुवात झाली होती.

फोटो स्रोत, YouTube

फोटो कॅप्शन,

शकुंतला देवी

त्यांच्या नावावर अनेक विक्रमसुद्धा आहेत. त्यांनी जगातल्या सगळ्यात वेगवान कॉम्प्युटरपेक्षाही वेगाने 50व्या सेकंदाला 201चं 23वं वर्गमूळ काढलं होतं आणि तो विक्रम आपल्या नावावर केला होता.

सी आर राव

सी. आर. राव त्यांच्या Theory of Estimation साठी ओळखले जातात.

कर्नाटकात जन्मलेले सी. आर. राव 10 भावंडांपैकी आठव्या क्रमांकाचे होते. त्यांनी आंध्र विद्यापीठातून गणितात एम. ए.ची डिग्री घेतली आणि कोलकातामध्ये सांख्यिकी विषयात एम.ए.ची पदवी घेतली होती.

फोटो स्रोत, YouTube

फोटो कॅप्शन,

सी आर राव

त्यांनी एकूण 14 पुस्तकं लिहिली आहेत. अनेक मोठ्या जर्नल्समध्ये त्यांचे 350 रिसर्च पेपर प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या अनेक पुस्तकांचा अनेक युरोपीय, चीन, आणि जपानी भाषांत अनुवाद झाला आहे. 18 देशांतील विद्यापीठातून त्यांना डॉक्टरेट मिळाली आहे.

सी. एस. शेषाद्री

सी. एस. शेषाद्री यांनी Algebraic Geometry या विषयात खूप काम केलं आहे. मद्रास विद्यापीठात गणितात पदवी घेतल्यानंतर त्यांनी मुंबई विद्यापीठातून डॉक्टरेट पूर्ण केली.

फोटो स्रोत, YouTube

फोटो कॅप्शन,

सी एस शेषाद्री

याशिवाय त्यांनी शेषाद्री Constant आणि नरायशम शेषाद्री Constant चा शोध लावला. 2009 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)