जीएसटी घटवण्याचा निर्णय, सिनेमा तिकीट, टीव्ही आणि कंप्युटर झाले स्वस्त

gst Image copyright Getty Images

शनिवारी नवी दिल्लीमध्ये झालेल्या जीएसटी काउंसिलच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. आता फक्त 28 वस्तूंवरच 28 टक्के जीएसटी आकारला जाणार आहे. तर अनेक गोष्टी स्वस्त करण्यात आल्या आहेत.

तर एकूण 27 वस्तूंवरील जीएसटी 18 टक्क्यांवरून 12 टक्के करण्यात आला आहे. 6 वस्तूंवरील जीएसटी 28 टक्क्यांवरून 18 टक्के करण्यात आला आहे.

एसी आणि डिश वॉशरवर 28 टक्के जीएसटी कायम ठेवण्यात आला आहे. चैनीच्या वस्तू आणि तंबाखूजन्य पदार्थांनासुद्धा 28 टक्क्यांच्या गटात कायम ठेवण्यात आलं आहे.

Image copyright Twitter

या वस्तूंवरील जीएसटी आता 28 वरून 18 टक्क्यांवर

1) 100 रुपयांवरील सिनेमा तिकीट

2) नॉर्मल साईझचे टीव्ही

3) व्हीडिओ गेम

4) गाड्यांचे सुटे भाग

5) कंप्युटर्स

6) टायर्स

7) मोबाईल बॅटरी

या वस्तूंवरील जीएसटी आता 18 वरून 12 टक्क्यांवर

1) 100 रुपयांपर्यंतचं सिनेमा तिकीट

2) बिझनेस क्लासचा धार्मिक प्रवास

3) थर्ड पार्टी इंश्युरन्स प्रिमिअम

या वस्तूंवरील जीएसटी आता 18 वरून 5 टक्क्यांवर

1) इकनॉमी क्लासचा धार्मिक प्रवास

Image copyright Getty Images

जनधन खात्यांसाठी बँकांमार्फत देण्यात येणार सुविधा जीएसटीच्या बाहेर ठेवण्यात आली आहे.

तसंच रिअल इस्टेट क्षेत्रावरील जीएसटीबाबतचा निर्णय मात्र या बैठकीत होऊ शकला नाही. पुढच्या बैठकीत हा निर्णय होण्याची शक्यता आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)