बाला रफिक शेख ठरला यंदाचा महाराष्ट्र केसरी, सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

बाला रफिक शेख

जालन्यात झालेल्या महाराष्ट्र केसरीच्या लढतीत बुलडाण्याच्या बाला रफिक शेखनं पुण्याच्या अभिजित कटकेचा पराभव केला आहे.

अभिजीत कटकेवर 11-3 अशी मात करत बाला रफिक शेखनं मानाचा 'महाराष्ट्र केसरी'चा किताब पटकवला आहे. अंतिम लढतीचा हा सामना चांगलाच रंगतदार ठरला.

बाला रफिक शेख जिंकताच मैदानावर जोरदार जल्लोष झाला. लोकांनी आणि समर्थकांनी बालाला डोक्यावर घेतलं आणि रोजदार घोषणा दिल्या.

Image copyright Twitter

राज्यमंत्री अर्जुन खोतकर, विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या हस्ते विजेत्या बाला रफिक शेखला चांदीची गदा देण्यात आली.

तर दुसरीकडे सोशल मीडियावर #महाराष्ट्रकेसरी, #बाला_रफिक_शेख, #Maharashtrakesari असे हॅशटॅग वापरून कुस्तीप्रेमी शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

या स्पर्धेनंतर धनंजय मुंडे यांनी ट्वीट करून बाला रफिर शेखचं अभिनंदन केलं आहे.

त्यासोबतच, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील बाला रफिकचं ट्विटरवरून अभिनंदन केलं आहे.

सचिन तानाजी सोनावळे यांनी देखील आपल्या ट्विटर हॅंडलवरून शुभेच्छ दिल्या आहेत.

Image copyright Twitter

विशाल हुलावळे यांनी आपल्या ट्वीटमध्ये, "१३ वर्षांनी माती विभागातून महाराष्ट्र केसरी!", असं म्हणत बाला रफिक शेखचं अभिनंदन केलं आहे.

तर राष्ट्रावादी काँग्रेसनं आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून नवाब मलिक यांच ट्वीट रिट्वीट करत बाला रफिक शेखचं अभिनंदन केलं आहे.

अभिजीत बोंडे यांनी अतिशय काट्याची लढत दोघांमध्ये झाली, असं म्हणत अभिनंदन केलं आहे.

Image copyright Tweet

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)