महेंद्रसिंग धोनीचं पुनरागमन; ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडविरुद्ध वनडे, T20 खेळणार

भारतीय क्रिकेट संघ, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

महेंद्रसिंग धोनीचं वनडे आणि ट्वेन्टी-20 संघात पुनरागमन झालं आहे.

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे आणि ट्वेन्टी-20 मालिकेसाठी भारतीय संघात महेंद्रसिंग धोनीचं पुनरामगन झालं आहे.

वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेन्टी-20 मालिकेसाठी महेंद्रसिंग धोनीला संघात समाविष्ट करण्यात आलं नव्हतं. धोनीऐवजा युवा ऋषभ पंतला पसंती देण्यात आली होती. मात्र पुढील वर्षी होणाऱ्या वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर धोनीसारख्या अनुभवी खेळाडूला निवडसमितीने प्राधान्य दिले आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे आणि ट्वेन्टी-20 मालिकांसाठी निवडसमितीने संघ जाहीर केला.

दुखापतींच्या कारणास्तव प्रदीर्घ काळ दूर राहिलेल्या मात्र आता फिट झालेल्या हार्दिक पंड्या आणि केदार जाधव या जोडगोळीचं संघात पुनरागमन झालं आहे.

भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन वनडे तर न्यूझीलंडविरुद्ध पाच वनडे आणि तीन ट्वेन्टी-20 सामने खेळणार आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

महेंद्रसिंग धोनी

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्ध वनडेसाठी भारतीय संघ

विराट कोहली, शिखर धवन, रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी, लोकेश राहुल, अंबाती रायुडू, दिनेश कार्तिक, केदार जाधव, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद, मोहम्मद शमी.

न्यूझीलंडविरुद्ध ट्वेन्टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ

विराट कोहली, शिखर धवन, रोहित शर्मा, लोकेश राहुल, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)