जान्हवी कूपर स्मृती इराणींना आंटी म्हणून हाक मारते तेव्हा.. - सोशल

स्मृती इरणी

फोटो स्रोत, AFP

रोहित वेमुलप्रकरणात स्मृती इराणीने केलेल्या वक्तव्यावर 'द टेलीग्राफ' या इंग्रजी वृत्तपत्राने एक चित्ताकर्षित हेडलाईन दिली होती - आंटी नॅशनल.

यानंतर स्मृती इरणींनी त्या हेडिंगाला आपल्या खास शैलीत प्रतिउत्तरही दिलं होतं. पण यावेळी स्मृतींनी कुठल्या वृत्तपत्राने नाही तर चक्क जान्हवी कपूरनेच आंटी म्हणून हाक मारल्याचं कळतंय.

झालं असं की, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी आपल्या इंस्टाग्रामवर दिवंगत श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूरसोबतचा एक बूमरँग व्हीडिओ शेअर केला आहे.

या पोस्टच्या कॅप्शनमध्ये स्मृती लिहितात, "यापेक्षा कोणीतरी माझा जीव घेऊन टाका"- असा हा क्षण. जेव्हा जान्हवी कपूरने मला आंटी म्हणून हाक मारल्यासाठी इतक्या प्रेमाने माफी मागितली."

त्यापुढे लिहितात, "आणि त्याला उत्तर देताना आपल्याकडे 'काहीच हरकत नाही बेटा' असं बोलण्यावाचून काही पर्याय नसतो"

##टोटल_सियापा ही आजकालची मुलं. #आंटी_किसको_बोला.''

स्मृती इराणींच्या या गंमतीशीर पोस्टवर अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत.

फोटो स्रोत, AFP

स्मृतींच्या पोस्टवर लोक काय बोलतायत?

कुनाल वघेरा लिहितात, "स्मृती इराणी सगळ्यात कूल मंत्री आहेत."

संजम नावाचे यूजर लिहितात, "जान्हवी इतकी मोठी तरी झाली आहे, की ती तुम्हाला आंटी नाही तर मॅडम बोलवायला हवं. ही मोठ्या लोकांची पोरं पण ना..."

तर शुचि श्रीवास्तव म्हणातात, "मॅडम काहीही म्हणा, पण तुमचे कॅप्शन्स एकदम भारी असतात."

सोना शर्मा लिहतात, "हाहाहा... आज काल कुणालाही आंटी बोलवणं म्हणजे शिवी दिल्यासारखं झालंय."

स्मृती इराणीचं वय ४२ तर जान्हवी २१ वर्षांची आहे. काही महिन्यांपूर्वीच जान्हवीने धडक नावाच्या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)