2018 ठरलं शाही थाटाच्या विवाहसोहळ्यांचं वर्ष: प्रियंका-निक, दीपिका-रणवीर ते हॅरी-मेगन

बॉलिवुडच्या आघाडीच्या अभिनेत्रींनी या वर्षी लग्न केलं.

फोटो स्रोत, Twitter

फोटो कॅप्शन,

बॉलिवुडच्या आघाडीच्या अभिनेत्रींनी या वर्षी लग्न केलं.

2018 या वर्षात अनेक विवाहसोहळे विविध कारणांनी चर्चेत राहिले. फिल्म इंडस्ट्री ते बॅडमिंटनचं कोर्ट, विंडसर पॅलेस ते अंबानींच्या अंगणात, सर्वत्र सनईचे सूर ऐकू आले.

दीपिका पदुकोण-रणवीर सिंग यांनी इटलीत जाऊन केलेला विवाह पण त्यांचे रिसेप्शन बेंगळुरू तसंच मुंबईत आठवडाभर चालले. प्रियंका चोप्राचं निक जोनासबरोबरचं लग्नही आठवडाभर चाललं. तसंच जगभरातल्या नेत्यांनी-अभिनेत्यांनी हजेरी लावली असा इशा अंबानी आणि आनंद पिरामल यांचा विवाहसोहळा अनेक कारणांसाठी चर्चेत राहिला.

या विवाहसोहळ्यांत कोणकोण उपस्थित राहिलं, इथपासून ते त्यांच्यासाठी किती खर्च करण्यात आला, उपस्थितांनी कोणते कपडे घातले, यापर्यंत चर्चा होत राहिली. त्यामुळे 2018 हे वर्ष शाही विवाहसोहळ्यांचं ठरलं, असं नक्कीच म्हणता येईल.

टाकूया एक नजर या लग्नसोहळ्यांवर -

1. सोनम कपूर-आनंद अहुजा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

सोनम कपूर-आनंद हुजा

अभिनेत्री सोनम कपूर आणि आनंद अहुजा यांनी 8 मे रोजी विवाह केला. या लग्नासाठी बॉलिवुडमधील विविध तारे-तारका उपस्थित होते.

मुंबईमधील वांद्रे येथे हा विवाहसोहळा संपन्न झाला. त्यांची लव्ह स्टोरी तर चर्चेत होतीच, पण लग्नात आनंदने घातलेल्या स्पोर्ट्स शूजनी वेगळंच लक्ष वेधलं. पण का घातले त्याने स्पोर्ट्स शूज? सविस्तर वाचा इथे

2. नेह धुपिया - अंगद बेदी

10 मे रोजी अभिनेत्री नेहा धुपिया आणि अभिनेता अंगद बेदी यांनी विवाह केला.

त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात त्यांना एक कन्यारत्न प्राप्त झालं. तिचं नाव त्यांनी मेहर ठेवलं आहे.

3. प्रिन्स हॅरी-मेगन मर्कल

ब्रिटिश राजपदासाठी आता सहावे दावेदार असलेले राणी एलिझाबेथ यांचे नातू प्रिन्स हॅरी आणि अमेरिकन अभिनेत्री मेगन मर्कल हे विंडसरमध्ये सेंट जॉर्ज चॅपेल येथे विवाहबद्ध झाले. 19 मे रोजी झालेला हा विवाहसोहळा जगभरातल्या लाखो लोकांनी टीव्हीवरही पाहिला.

व्हीडिओ कॅप्शन,

पाहा आणि मेगनची लव्ह स्टोरी

4. रणवीर सिंह - दीपिका पदुकोण

फोटो स्रोत, Getty Images

अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण इटलीतील लेक कोमो येथे 14 आणि 15 नोव्हेंबर रोजी विवाहबद्ध झाले. विराट-अनुष्का यांच्यानंतर परदेशात झालेल्या या विवाहावर माध्यमांमध्ये मोठी चर्चा झाली. पण विवाहसोहळ्याचे काही छुपे फोटोस प्रसिद्ध झाले होते.

पण त्यानंतर दोघांनी एकापाठोपाठ एक असे तीन-चार स्वागत सोहळे आयोजित केले, जे बेंगळुरू तसंच मुंबईत माध्यमांसमक्ष पार पडले.

5. प्रियंका चोप्रा - निक जोनस

अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि गायक निक जोनास यांनीही वर्षाअखेरीस आपली जीवनगाठ बांधली. आधी जोधपूरमध्ये झालेल्या थाटामाटाच्या डेस्टिनेशन वेडिंगमध्ये संगीत समारंभ, मेहंदी, वधुवर पक्षांतले क्रिकेट सामने आणि बरंच काही रंगलं.

फोटो स्रोत, Getty Images

त्यानंतर दिल्ली आणि मुंबईत झालेल्या रिसेप्शन्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक नेतेमंडळी तसंच तारेतारकांनी हजेरी लावली.

अशा प्रकारे हा विवाह सोहळा जवळपास आठवडाभर सुरू होता. त्यामुळे समाजमाध्यमांमध्ये या विवाहाची चर्चाही अनेक दिवस होती.

6. इशा अंबानी - आनंद पिरामल

देशातली सर्वांत धनाढ्य व्यक्ती मुकेश अंबानी यांची कन्या इशा अंबानी आणि उद्योजक आनंद पिरामल 12 डिसेंबर रोजी मुंबईत अँटिलिया या अंबानींच्या निवासस्थानी विवाहबद्ध झाले.

फोटो स्रोत, Getty Images

या सोहळ्यात देशभरातील अनेक राजकीय नेते, अभिनेते-अभिनेत्री उपस्थित होतेच. शिवाय देशाविदेशातील अनेक पाहुणेही या विवाहसोहळ्यासाठी आले होते.

  • हिलरी क्लिंटन आणि जॉन केरी यांची उपस्थिती तसंच ग्लोबल पॉपस्टार बेयाँसच्या परफॉर्मन्समुळे या सोहळ्याची जागतिक पातळीवर दखल घेतली गेली.

7. कपिल शर्मा - गिन्नी छत्रा

फोटो स्रोत, Getty Images

कॉमेडियन आणि अभिनेता कपिल शर्मा यांने त्याची प्रेयसी गिननी छत्रा हिच्याबरोबर 12 डिसेंबर रोजी जालंधर येथे विवाह केला. या विवाहासाठी अनेक राजकीय नेते, अभिनेते, खेळाडू उपस्थित होते.

8. सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप

बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप हेही 16 डिसेंबर रोजी विवाहबंधनात अडकले.

फोटो स्रोत, Getty Images

वर्षभर झालेल्या झगमगाटीच्या विवाहसोहळ्यांमध्ये या जोडप्यानं साधेपणाने केलेलं लग्न सोशल मीडियावर वेगळ्याच चर्चेचं कारण ठरलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)