मकरसंक्रात: पतंगाचा मांजा नेमका तयार कसा होतो?

अहमदाबादमध्ये दरवर्षी उत्तरप्रदेशचे कारागीर खास प्रकारचा मांजा तयार करतात. हा मांजा तयार करण्यासाठी हे कारागीर उत्तरप्रदेशातल्या लखनौमधून इथे येतात. हा मांजा तयार करण्याची एक खास पद्धतही आहे. ही खास पद्धत तुम्हाला खाली दिलेल्या बीबीसी विश्वच्या बुलेटीनमध्ये पाहता येतील.

या कामगारांच्या गेल्या दोन-तीन पिढ्या याच व्यावसायत आहेत. हे कामगार एकदिवसात 200 रीळ म्हणजेच तब्बल 30 किलोमीटर लांबीचा मांजा तयार करतात.

'बीबीसी विश्व' हे मराठीतलं एकमेव पूर्णतः डिजिटल बुलेटीन तुम्ही सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी ७.०० वाजता मोबाईलवर जिओ टीव्ही अॅपवर पाहू शकता. तसंच आमच्या युट्यूब चॅनलवर इथे कधीही बघू शकता - youtube.com/bbcnewsmarathi

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)