बीबीसी मराठी राऊंड अप

गोपीनाथ मुंडे Image copyright Getty Images

बीबीसी मराठीवर प्रकाशित झालेल्या पाच महत्त्वाच्या बातम्या पुढीलप्रमाणे:

गोपीनाथ मुंडेंचा मृत्यू की घात?

3 जून 2014 ला भाजपचे नेते आणि तत्कालीन केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांचं अपघाती निधन झालं होतं. त्यांचा मृत्यू अपघात होता की घातपात अशी चर्चा सुरू झाली होती. मुंडेंना गोपीनाथ मुंडेंना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना असल्यामुळं त्यांची हत्या केल्याचा खळबळजनक आरोप सय्यद शुजा या कथित सायबर एक्सपर्टनं केला.

गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूशी संबंधित प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला. ही संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

राज ठाकरे लोकसभेला राष्ट्रवादीबरोबर जाणार की काँग्रेसला जाणार?

राज ठाकरे 2019च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाऊ शकतात. येत्या निवडणुकीत प्रत्येक राज्यात छोट्या पक्षांना सोबत घेऊन निवडणुकीला सामोरं जाण्याची रणनीती काँग्रेसने आखली आहे.

Image copyright Getty Images

त्याचाच भाग म्हणून महाराष्ट्रात मनसेला काही जागांसाठी बरोबर घेता येईल का किंवा त्यांच्याशी पडद्यामागे काही करार होऊ शकतो का याची चाचपणी सुरु आहे. या संपू्र्ण घडामोडी इथे वाचू शकता.

शिवकुमार स्वामी- लिंगायात समुदायाविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी

लिंगायत समाजाचे गुरू श्री श्री श्री शिवकुमार स्वामी यांचं 111 व्या वर्षी निधन झालं. लिंगायत समाजाच्या स्वामींना चालते फिरते देव असं म्हटलं जात असे. शिवकुमार स्वामी यांच्या निधनानंतर त्यांच्याविषयी चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. त्यांच्याविषयी आणि एकूणच लिंगायत समाजाविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला.

Image copyright Twitter

शबरीमला मध्ये प्रवेश करणाऱ्या महिलेला नवऱ्याने घराबाहेर काढलं

केरळातील शबरीमला मंदिरात प्रवेश करून इतिहास रचणाऱ्या कनकदुर्गा यांना त्यांच्या पतीने घराबाहेर काढलं आहे. 50 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या आणखी एका महिलेबरोबर त्यांनी या मंदिरात प्रवेश केला होता.

Image copyright AFP

त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांशी या प्रकरणावरून सातत्याने वाद झाले. याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

अमेरिका: लष्करात ट्रान्सजेंडर बंदीवर सुप्रीम कोर्टाचं शिक्कामोर्तब

अमेरिकेतील लष्करात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी ट्रान्सजेंडर लोकांनी घातलेल्या बंदीला सुप्रीम कोर्टाने हिरवा कंदील दाखवला आहे.

Image copyright Reuters

ट्रान्सजेंडर लोकांची नियुक्ती केली तर लष्कराच्या प्रभावामुळे आणि क्षमतेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं असं ट्रंप यांना वाटतं. हे संपूर्ण प्रकरण जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)