प्रियंका गांधींना रॉबर्ट वाड्रा म्हणतात... मैं तुम्हारे साथ हूँ

प्रियंका गांधी Image copyright AFP

प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी आणि पूर्व उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदी नियुक्ती झाल्यानंतर सोशल मीडियावर विविध नेत्यांनी आणि पत्रकारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनीही पत्नी प्रियंकाचं अभिनंदन केलं. या आयुष्याच्या नवीन टप्प्यावर मी कायम तुझ्या सोबत असले अशी पोस्ट रॉबर्ट वढेरा यांनी फेसबुकवर लिहिली आहे.

Image copyright facebook

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले की प्रियंका गांधी आणि ज्योतिरादित्य सिंधिया हे शक्तिशाली नेते आहेत. उत्तर प्रदेशाचं राजकारण बदलण्यासाठी आम्हाला तरुण नेतृत्वाची गरज होती.

प्रियंका गांधी यांच्या निवडीमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये एक नवीन जोश निर्माण होईल अशी आशा काँग्रेस नेते मोतीलाल व्होरा यांना वाटते.

ज्येष्ठ पत्रकार आणि द प्रिंट चे संपादक शेखर गुप्ता यांच्या मते प्रियंका गांधीचा राजकारणातला प्रवेश हीच फक्त बातमी नाही. तर काँग्रेससाठी कायम कठीण असलेल्या पूर्व उत्तर प्रदेश भागासाठी त्याची निवड करण्यात आली. तिथे त्यांचा सामना थेट मोदी आणि योगी यांच्याशी होणार आहे. अशा प्रकारचा धोका सहसा काँग्रेस पत्करत नाही.

हिंगोलीचे खासदार राजीव सातव यांनीही प्रियंका गांधीचं अभिनंदन केलं आहे. त्यांच्या नेतृत्वाचा लाभ होऊन काँग्रेसला भरपूर लाभ होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रियंका नही आंधी है, देश की दुसरी की इंदिरा गांधी है अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

ज्येष्ठ पत्रकार बरखा दत्त यांनीही प्रियंका गांधी यांच्या निवडीवर ट्विट केलं त्या म्हणतात, "पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांचा प्रभाव असलेल्या भागात त्या प्रचार करतील. हे धोकादायक तरीही काँग्रेसतर्फे मोठं पाऊल आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनीही प्रियंका गांधी आणि ज्योतिरादित्य शिंदे यांचं अभिनंदन केलं.

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनीही प्रियंका गांधीचं अभिनंदन केलं आहे.

दरम्यान आता प्रियंका गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवणार का असा प्रश्न ज्येष्ठ पत्रकार प्रभू चावला यांनी केला आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)