सिद्धार्थ चांदेकरचा मिताली मयेकरबरोबर साखरपुडा, सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

सिद्धार्थ चांदेकर Image copyright instagram/sidchandekar

'गुलाबजाम' फेम आणि मराठी चित्रपटसृष्टीचा 'चॉकलेट बॉय' म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सिद्धार्थ चांदेकरनं त्याच्या चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे.

सिद्धार्थ आणि त्याची गर्लफ्रेंड मितालीनं निवडक कुटुंबीयांच्या उपस्थितीत साखरपुडा केला आहे.

सिद्धार्थने त्याच्या साखरपुड्याचे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. एका नव्या नात्याची आणि नव्या प्रवासाची सुरुवात करत असल्याचं त्यानं म्हटलं आहे.

Image copyright instagram/sidchandekar

गेल्या वर्षी व्हॅलेंटाइन डेला पहिल्यांदा सिद्धार्थ आणि मितालीनं इन्स्टाग्राम पोस्टमधून #thisisit असं म्हणत आपल्या नात्याची कबुली दिली होती.

त्यानंतर बरोबर ८ महिन्यानंतर १२ सप्टेंबरला सिद्धार्थनं मितालीला प्रपोज केलं होतं.

सिद्धार्थनं त्यावेळीदेखील मितालीसोबतचा फोटो शेअर करत 'तिला प्रपोज केलंय आणि तिनं होकारही दिला,' असं म्हणत आयुष्यातील सर्वांत खास व्यक्तीची नव्यानं ओळख आपल्या चाहत्यांना करून दिली होती.

'उर्फी' चित्रपटातून मितालीने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. तिने चित्रपटांबरोबरच मालिकेतही काम केलं आहे. त्यानंतर, छोट्‍या पडद्‍यावरील 'फ्रेशर्स' मालिकेतही मितालीने काम केलं आहे.

तर 'गुलाबजाम, 'क्लासमेट', वजनदारसारखे अनेक चित्रपट आणि काही मालिकांमधून सिद्धार्थनं प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.

दरम्यान, या दोघांनी आपल्या खारपुड्याचे फोटोज सोशल मीडियावर शेअर करताच, त्यांच्यावर आता शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Image copyright instagram/sidchandekar

प्रिया बापट, 'काहे दिया परदेस'मधली गौरी अर्थात सायली, प्रार्थना बेहेरे, अनिकेत विश्वासरावसारख्या अनेक मराठी सेलिब्रिटींनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)