मोदींकडे आज एक 'जॉर्ज' असता, तर चित्र वेगळं असतं - बीबीसी मराठी राउंडअप

Image copyright ARKO DATTA/AFP/GETTY IMAGES

मोदींकडे आज एक 'जॉर्ज' असता, तर चित्र वेगळं असतं

'कामगार नेता हरपला,' माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अशी प्रतिक्रिया दिली.

2014च्या विजयाचा उन्माद ओसरू लागला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्या टर्मच्या शोधात आहेत. त्यांना एका गोष्टीची जबर कमतरता भासत आहे.

ती म्हणजे मित्रपक्षांची. दोन महिन्यावर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकांत एखादा चमत्कार घडला तरच भाजपाला बहुमत मिळण्याची शक्यता आहे असे पक्षातले निष्ठावंत देखील मान्य करतात.

या उलट फर्नांडिस यांच्यासारखा नेता मोदींबरोबर असता तर असा प्रश्नच पडला नसता. फर्नांडिस यांचे सर्व पक्षांत मित्र होते. अगदी काँग्रेसमध्ये देखील. पन्नास वर्षांपूर्वी शिवसेनेचा उदय होण्याच्या अगोदरपासून त्यांची बाळ ठाकरेंशी मैत्री होती.

शिवसेना प्रमुखांना 'बाळ' या एकेरी नावाने हाक मारणारा कदाचित फार्नांडिस हे एकमेव राष्ट्रीय नेते असावेत. ठाकरे यांच्याशी कितीही राजकीय मतभेद असले तरी 'मातोश्री'त जाऊन ते हक्काने जेवण करायचे, असे सेनेतील जुने जाणते सांगतात.

शरद पवार यांच्याबरोबर त्यांचे सूत जुळायचे. कसं होतं फर्नांडिस यांचं राजकारण? अधिक जाणून घेण्यासाठी इथं क्लिक करा.

मराठा समाज OBC आहे, राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल

मराठा समाजाचा SEBC प्रवर्गात समावेश व्हावा यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने शिफारस केली आहे. मराठा समाजाला SEBC प्रवर्गात आरक्षण देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारसीनुसारच 18 नोव्हेंबरला केली होती.

निवृत्त न्यायमूर्ती एम.जी.गायकवाड यांच्या अध्यक्षतेखालील नऊ सदस्यीय राज्य मागासवर्ग आयोगाने एक हजार पानी सविस्तर अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे.

Image copyright Getty Images

न्यायालयाच्या आदेशानुसार, मंगळवारी आयोगाचा संपूर्ण अहवाल मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिकाकर्त्यांना राज्य सरकारने उपलब्ध केला.

या अहवालाची सॉफ्ट कॉपी बीबीसी मराठीला मिळाली आहे. या अहवालात कोणती निरीक्षणं मांडण्यात आली आहेत तसेच आयोगाने काय शिफारसी केल्या आहेत ही माहिती या लेखात देण्यात आली आहे. अहवालातल्या बारिकसारिक गोष्टी जाणून घेण्यासाठी इथं वाचा.

राहुल गांधींच्या भेटीत रफालचा विषयच निघाला नाही - पर्रिकर

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची गोव्याचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते मनोहर पर्रिकरांशी मंगळवारी झालेली भेट वादात सापडली आहे. आणि त्याचं कारण आहे रफाल घोटाळ्याचं प्रकरण.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी गेले तीन दिवस गोव्यात होते. अर्थात हा दौरा राजकीय नसून खासगी असल्याचं सांगितलं जात होतं.

याच दौऱ्यात काल राहुल गांधींनी मनोहर पर्रिकर यांची भेट घेतली. आपण केवळ पर्रिकर यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी गेलो होतो, मात्र यावेळी पर्रिकर यांनी आपला रफाल घोटाळ्यात हात नसल्याचं म्हटलं होतं. असा दावा राहुल यांनी केला होता. राहुल-पर्रिकर यांच्या भेटीत नेमकं काय घडलं हे जाणून घेण्यासाठी इथं क्लिक करा.

ICICI बँक प्रकरण : 'चंदा कोचर यांनी पदाचा गैरवापर केला'

चंदा कोचर यांनी व्हीडिओकॉन प्रकरणात बँकेच्या अचारसंहितेचा भंग केला आहे असं चौकशीत समोर आलं आहे. ICICI बँकेने निवृत्त न्यायाधीश बी.एन.श्रीकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली होती. त्यांच्या अहवालात चंदा कोचर यांच्यावर शिस्तभंगाचा ठपका ठेवण्यात आला आहे. तसंच कोचर यांनी पदाचा गैरवापर केला असल्याचंही या अहवालात म्हटलं आहे.

Image copyright Getty Images

भारतीय बँकिंग क्षेत्रातलं पुरुषांचं वर्चस्व तोडणाऱ्या आणि संपूर्ण बँकिंग क्षेत्रात आपली वेगळी ओळख प्रस्थापित करणाऱ्या चंदा कोचर यांच्यावर आता CBI च्या कारवाईचं वादळ घोंघावतं आहे. आज आलेल्या चौकशी अहवालाने त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

CBI ने चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांच्याविरोधात गुन्हेगारी कट रचल्याचा आणि फसवणुकीचा गु्न्हा दाखल केला आहे. व्हीडिओकॉन समूहाला कर्ज देण्याच्या प्रकरणात कोचर आरोपांचा सामना करत आहेत. याविषयी अधिक माहितीसाठी इथं क्लिक करा.

'उत्तर कोरिया पूर्णपणे अण्वस्त्र नष्ट करणार नाही' : गुप्तहेर संस्थांचा अहवाल

उत्तर कोरिया पूर्णपणे अण्वस्त्रांचा त्याग करण्याची शक्यता कमी आहे, असा अहवाल अमेरिकेच्या गुप्तहेर संस्थेने दिला आहे.

The Worldwide Threat Assessment reportने दिलेल्या माहितीत इराण अण्वस्त्र बनवत नाही, पण रशिया आणि चीनकडून सायबर धोके वाढले आहेत, असंही म्हटलं आहे.

Image copyright Reuters

डायरेक्टर ऑफ नॅशनल इंटिलिजन्सनं The Worldwide Threat Assessment report सादर केला आहे. अमेरिकेचे राष्ट्रीय गुप्तहेर विभागाचे संचालक डॅन कोट्स आणि गुप्तचर विभागाच्या इतर अधिकाऱ्यांनी हा अहवाल सिनेटला मंगळवारी सादर केला.

उत्तर कोरियाला पूर्णपणे अण्वस्त्र नष्ट का करणार नाही? हे जाणून घेण्यासाठी इथं वाचा.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)