नरेंद्र मोदी अनिल अंबानींसाठी मध्यस्थ म्हणून काम करत होते-राहुल गांधी- बीबीसी मराठी राऊंडअप

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा राहुल गांधी

1. नरेंद्र मोदी अनिल अंबानींसाठी मध्यस्थ म्हणून काम करत होते-राहुल गांधी यांचा हल्ला

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अनिल अंबानींसाठी मध्यस्थाचं काम करत होते, त्यांनी ऑफिशियल सिक्रेट अॅक्टचा भंग केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे.

ते नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते. एअरबस कंपनीच्या एका एक्झिक्युटिव्हच्या ई-मेलचा दाखला देत राहुल गांधी यांनी हे आरोप केले आहेत.

रफाल कराराविषयी ज्यावेळी तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर, संरक्षण सचिव यांना काहीच माहिती नव्हती, तर मग हे कंत्राट आपल्यालाच मिळणार आहे, हे अनिल अंबानींना कसं समजलं? असा सवाल राहुल गांधी यांनी केला आहे. समजून घेऊया.

2. महाराष्ट्र: पुण्यात इंजिनीयर तरुणांवर उपोषणाची वेळ का आली?

"गावाकडे दुष्काळ आहे. वडील कोरडवाहू शेतीतून तुटपुंजं उत्पन्न मिळवतात, तरीदेखील ते महिन्याला मला 6 हजार रुपये पाठवतात. कारण त्यांना आशा आहे आज ना उद्या पोराला सरकारी नोकरी लागेल," स्वप्नील खेडकर त्याची व्यथा सांगत होता.

प्रतिमा मथळा गणेश साळुंखे

तो आणि त्याच्यासारखे अनेक इंजिनीयरिंग झालेले विद्यार्थी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चहाचे स्टॉल लावून, केळीचा गाडा लावून बेरोजगारीच्या विरोधात आंदोलन करत आहेत. का करावं लागतंय या तरुणांना उपोषण? जाणून घ्या.

3. MPSC परीक्षेत व्यापम घोटाळा सुरू आहे का?

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध पदांसाठी स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात. परीक्षेच्या एका आठवड्याआधी बैठक क्रमांकासह ओळखपत्र दिली जातात. त्यात बैठक क्रमांक उमेदवारांच्या मोबाईल क्रमांकाच्या आधारे देण्यात येतात. त्यामुळे ओळखीचे उमेदवार एका मागोमाग एक नंबर यावा म्हणून मोबाईल क्रमांक बदलत आहेत. त्यामुळे मास कॉपीचा प्रकार वाढतोय असं विद्यार्थ्यांचा दावा आहे.

प्रतिमा मथळा प्रातिनिधिक छायाचित्र

"महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमधील बैठकव्यवस्था सदोष असून यामुळे मास कॉपीला उत्तेजन मिळत आहे," या विद्यार्थ्यांनी उठवलेल्या वावड्या आहेत असं आयोगाने स्पष्टीकरण दिलं आहे. महाराष्ट्र युवक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन हा सगळा प्रकार म्हणजे महाराष्ट्रातील 'व्यापमं' आहे असा आरोप केला होता तसंच परीक्षा रद्द करण्याचीही मागणी केली होती. सविस्तर वाचा.

4. लोकसभा निवडणूक: शिवसेना-भाजप युतीची अधिक गरज कुणाला?

लोकसभा निवडणुकीत भाजपला मित्रपक्षांची अधिकच निकड भासू लागलीये. पण भाजपची ही निकड महाराष्ट्रात पूर्ण करण्यासाठी शिवसेनेला मोठी किंमत वसूल करायची आहे आणि शिवसेनेसाठी भाजप पदरमोड करणार का कळीचा मुद्दा बनला आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा शिवसेना-भाजप

या आंदोलनाला विरोधी पक्षांतील तमाम मोठ्या नेत्यांची गर्दी केलीच, पण शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची उपस्थिती महाराष्ट्रासाठी लक्षवेधी ठरली. या निमित्ताने एक प्रश्न उपस्थित होतो - उत्तर प्रदेशनंतर संसदेत सर्वाधिक खासदार पाठवणाऱ्या महाराष्ट्रात भाजप घटक पक्ष असलेल्या शिवसेनेपुढे आगतिक झालाय का, असाही. काय आहे नेमकी परिस्थिती- वाचा

5. पूर्व भारतात सूर्य दोन तास लवकर मावळतो, म्हणून गरीब मुलांच्या शिक्षणावर परिणाम होतो

संपूर्ण भारतासाठी एकच प्रमाण वेळ (time zone) ही ब्रिटीश राजवटीची देणगी आहे. एकाच वेळेवर सगळा देश चालवणं हे एकात्मतेचं प्रतीक होतं. पण संपूर्ण देशासाठी एकच वेळ असणं ही अनेकांच्या मते चुकीची कल्पना आहे.

भारत पूर्वेकडून पश्चिमेकडे पसरला आहे. हे अंतर सुमारे 3 हजार किलोमीटर आहे. त्यादरम्यान 30 अंश रेखावृत्त जातात. त्यामुळे अरुणाचल प्रदेश आणि गुजरात दरम्यान सरासरी वेळेत दोन तासांचा फरक पडतो. काय आहे परिस्थिती?

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)