रफाल : CAG रिपोर्टनंतर राहुल गांधींची पुन्हा मोदींवर टीका - बीबीसी राउंडअप

Image copyright Reuters

1. रफाल : CAG रिपोर्टनंतर राहुल गांधींची पुन्हा मोदींवर टीका

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी रफाल करारावरून पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. रफाल करार हा दोन पातळीवर अपयशी ठरल्याचं विधान राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत केलं.

ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असा दावा केला होता की भाजप सरकारचा रफाल करार हा युपीएच्या काळात झालेल्या कराराहून अधिक चांगला आहे.

हा करार युपीएच्या कराराच्या तुलनेत पैसे आणि वेळ वाचवणारा ठरेल असा दावा पंतप्रधानांनी केला होता, पण या दोन्ही पातळ्यांवर हा करार अपयशी ठरला आहे.

राहुल गांधी यांनी केलेली टीका वाचण्यासाठी येथे क्लिक करा

2. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत - मुलायम सिंह यादव

समाजवादी नेते मुलायम सिंह यादव यांनी लोकसभेत भाषण करताना नरेंद्र मोदींनी पुन्हा पंतप्रधान व्हावं असं म्हटलं आहे.

16 व्या लोकसभेत बुधवारी समारोपाची भाषणं झाली.

Image copyright LOKSABHA TV

त्यावेळी बोलताना मुलायम सिंह म्हणाले," सर्व सदस्य पुन्हा निवडून यावेत अशी माझी इच्छा आहे. पंतप्रधान (नरेंद्र मोदी) तुम्ही पुन्हा पंतप्रधान व्हावं, अशी सदिच्छा मी व्यक्त करतो."

मुलायम सिंह यादव त्यांच्या भाषणात म्हणाले, "माझी अशी इच्छा आहे की या ठिकाणी जितके सदस्य आहेत ते पुन्हा निवडून यावेत. आम्हाला तर पूर्ण बहुमत मिळू शकत नाही तेव्हा पंतप्रधानजी तुम्ही पुन्हा एकदा पंतप्रधान व्हा."

मुलायम सिंह यादव यांच्या भाषणानंतर उमटलेल्या प्रतिक्रिया वाचण्यासाठी

3. शरद पवार पंतप्रधान होण्याची शक्यता सध्याच्या घडीला किती ?

निवडणुका जवळ आल्या की शरद पवार पंतप्रधान होणार का अशी चर्चा सुरू होते. आगामी 2019 ची निवडणूकही त्याला अपवाद नाही. याआधीही अनेकदा त्यांची पंतप्रधानपदासाठी त्यांच्या नावाची अनेकदा चर्चा झाली आहे.

Image copyright Reuters

कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात बोलताना "ज्यांच्या खासदारांची संख्या दोनअंकी नाही, तेसुद्धा पंतप्रधानपदाचं स्वप्न पाहात आहेत. त्यामुळे पंतप्रधानपद आहे की संगीतखुर्ची हेच कळत नाही" असं म्हणत शरद पवारांवर निशाणा साधला.

त्यामुळे शरद पवार पंतप्रधान होण्याची शक्यता सध्याच्या घडीला आहे का? याची चर्चा पुन्हा सुरु झाली आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी

4. आसाम : नागरिकत्व सुधारणा विधेयक 2016 आहे तरी काय?

Citizenship Amendment Bill 2016 किंवा नागरिकत्व सुधारणा विधेयक 2016 म्हणजे नेमकं काय आहे. या विधेयकाला आसाममधून विरोध होत आहे. त्याची कारणं काय आहेत हे आपण समजून घेऊ या.

हे विधेयक संसदेत मंजूर झाल्यानंतर बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून येणाऱ्या मुस्लिमेतर निर्वासितांना भारतात नागरिकत्वाचा हक्क प्राप्त होईल.

जर हे विधेयक मंजूर झालं तर स्थानिकांचे हक्क डावलले जातील अशी भीती आसाममधील नागरिकांना वाटत असल्यामुळे या विधेयकाचा ते विरोध करत आहेत.

नागरिकत्व सुधारणा विधेयक समजून घेण्यासाठी येथे क्लिक करा

5. राम मंदिरासाठी अरब शेखानं सुषमा स्वराजांसमोर भजन गायलं?

सोशल मीडियावर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचा एक जुना व्हीडिओ व्हायरल होतो आहे. राम मंदिराला पाठिंबा म्हणून एका जाहीर कार्यक्रमात सुषमा स्वराज यांच्यासमोर एक शेख भजन म्हणत आहेत असा हा व्हीडिओ आहे.

Image copyright DD NEWS

फेसबुकवर हा व्हीडिओ गेल्या दोन दिवसात लाखो नेटिझन्सनी पाहिला आहे. मंगळवारी काही हजार नेटिझन्सनी हा व्हीडिओ फेसबुकवर शेअर केला आहे.

काहीजणांनी एका विशिष्ट संदेशासह हा व्हीडिओ शेअर केला आहे. तो संदेश असा- "काही दिवसांपूर्वीच सुषमा स्वराज कुवेत दौऱ्यावर होत्या. त्यांच्या सन्मानार्थ शेख मुबारक अल-रशीद यांनी अयोध्येतील राम मंदिर निर्माणाच्या समर्थनार्थ एक गाणं म्हटलं. हे गाणं म्हणत त्यांनी भारतीयांची मनं जिंकली. आवर्जून पाहा."

या व्हीडिओचं सत्य वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)