IPL वेळापत्रक : कोहली-धोनी पहिल्याच मॅचमध्ये समोरासमोर

IPL

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

महेंद्रसिंग धोनीचं चेन्नई सुपर किंग्स आणि विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात IPL सलामीचा सामना रंगणार आहे.

इंडियन प्रीमिअर लीग (IPL) स्पर्धेचा अकरावा हंगाम 23 मार्चपासून रंगणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गतविजेते चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सलामीचा मुकाबला होईल.

चेन्नईत एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर रात्री 8पासून आयपीएलच्या बाराव्या हंगामाची सलामीची लढत रंगेल.

लोकसभा निवडणुकांमुळे IPL स्पर्धा भारतात होणार का याविषयी साशंकता होती. ही स्पर्धा दक्षिण आफ्रिका किंवा दुबई इथे होण्यासंदर्भातही चर्चा होती. मात्र IPL व्यवस्थापनाने स्पर्धा भारतातच आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

आयपीएल सामन्याचे एक दृश्य

स्पर्धेच्या पहिल्या दोन आठवड्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आवश्यक असल्यास या वेळापत्रकात बदल करण्यात येतील तसंच उर्वरित वेळापत्रक जाहीर करण्यात येईल.

IPL 11वा हंगामाचे पहिल्या दोन आठवड्यांचे वेळापत्रक

स्रोत : IPL वेबसाईट

गेल्या वर्षी महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सने जेतेपदावर कब्जा केला होता.

IPL जेतेपदाचे मानकरी

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)