काँग्रेसवर केला जाणारा पाकिस्तान प्रेमाचा आरोप किती खरा?-बीबीसी मराठी राउंड अप

राहुल गांधी ट्वीट

फोटो स्रोत, SM VIRAL POST

1. काँग्रेसवर केला जाणारा पाकिस्तान प्रेमाचा आरोप किती खरा?-फॅक्ट चेक

पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वातावरण संवेदनशील झालेलं असताना सोमवारी सकाळी #PakistanAndCongress हा ट्रेंड ट्वीटरवर दिसू लागला.

#PakistanAndCongress या हॅशटॅगसह ज्या नेटिझन्सनी ट्वीट केलं आहे त्यामध्ये उजव्या विचारसरणीच्या मंडळींचा समावेश आहे. काँग्रेसचा पाकिस्तानप्रति दृष्टिकोन नरमाईचा आहे, असा आरोप या नेटिझन्सचा आहे.

या नेटिझन्सनी केवळ ट्वीटरवर नव्हे तर फेसबुक आणि इतर मेसेजिंग अॅपवर प्रक्षोभक मजकूर शेअर केला आहे. या आरोपांमध्ये नेमकं किती तथ्य आहे याची पडताळणी बीबीसीनं केली. या आरोपांमागचं वास्तव जाणून घेण्यासाठी इथं क्लिक करा.

2. काश्मिरला विशेष दर्जा देणारं कलम ३७० आहे तरी काय?

फोटो स्रोत, Getty Images

पुलवामा हल्ल्यानंतर काश्मीरला असलेला कलम 370 अंतर्गत असलेला विशेष दर्जा काढून घेण्याची मागणी ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी केली आहे. समाजमाध्यमांवरही अशा प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. भारतीय राज्यघटनेतलं हे कलम 370 म्हणजे नेमकं काय आहे हे समजून घेण्यासाठी क्लिक करा.

3. शिवसेना भाजपची युती ही काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी फायद्याची की तोट्याची?

फोटो स्रोत, TWITTER/DEVENDRA FADNAVIS

शिवसेना आणि भाजपची युती झाल्यानंतर त्याचे राजकीय परिणाम काय होऊ शकतात याची सर्वत्र चर्चा आहे. ही युती हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून झाली आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे तर शिवसेना आणि भाजपची युती ही त्यांची गरज होती असं मत राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. या युतीचा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला फायदा होणार की त्यांच्यासमोरचं आव्हान कडवं होणारं, याबद्दलचं विश्लेषण वाचा.

4. UPSC: नागरी सेवा परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध

फोटो स्रोत, PTI

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) तर्फे घेतल्या जाणाऱ्या नागरी सेवा परीक्षेची जाहिरात सोमवारी प्रसिद्ध झाली आहे. यावर्षी एकूण 896 जागांसाठी ही जाहिरात आली असून विकलांग उमेदवारांसाठी 39 जागांची तरतूद करण्यात आली आहे. 1 ऑगस्ट 2019 पर्यंत 32 वर्षांपेक्षा जास्त वय नसलेल्या आणि 21 वर्ष पूर्ण केलेल्या उमेदवारांना ही परीक्षा देता येणार आहे. परीक्षा अर्ज भरण्याची अंतिम तारीख आणि अर्ज कसा भरावा हे वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

5. भारताने हल्ला केला तर पाकिस्तान प्रत्युत्तर देईल - इम्रान खान

फोटो स्रोत, Getty Images

जर पाकिस्तानवर हल्ला झाला तर पाकिस्तान विचार करणारा नाही, त्याचं उत्तर देईल, अशी प्रतिक्रिया पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दिली आहे. पुलवामा इथं झालेल्या हल्ल्यानंतर इम्रान खान यांनी राष्ट्राला उद्देशून भाषण केलं. त्यात त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. इम्रान खान यांनी पाकिस्तानची भूमिका मांडताना काय म्हटलं आहे?

6. IPL वेळापत्रक : कोहली-धोनी पहिल्याच मॅचमध्ये समोरासमोर

फोटो स्रोत, Getty Images

इंडियन प्रीमिअर लीग (IPL) स्पर्धेचा अकरावा हंगाम 23 मार्चपासून रंगणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गतविजेते चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सलामीचा मुकाबला होईल. चेन्नईत एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर रात्री 8पासून आयपीएलच्या बाराव्या हंगामाची सलामीची लढत रंगेल. आयपीएल स्पर्धांचं सविस्तर वेळापत्रक जाणून घेण्यासाठी क्लिक करा.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)