पुलवामा : महाराष्ट्रातील काश्मिरी मुलांना जवानांवरील हल्ल्यानंतर असुरक्षित वाटतं?

पुलवामा : महाराष्ट्रातील काश्मिरी मुलांना जवानांवरील हल्ल्यानंतर असुरक्षित वाटतं?

पुलवामा इथं झालेल्या हल्ल्यानंतर देशात इतर राज्यांत काश्मिरी युवकांवर हल्ले होण्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या काश्मिरी मुलींशी संवाद साधला. या मुली म्हणतात, त्यांना भारत आपला वाटतो आणि एका व्यक्तीची शिक्षा इतरांना देणं योग्य नाही.

या मुलींतील एक म्हणजे नर्गिस होय. "काश्मीरमध्ये रोजगाराच्या संधी नाहीत, शिक्षण घायचं तर काश्मीरच्या हवामानामुळे आणि सततच्या हिंसक घटनांमुळे पाच ते सहा महिने मिळतात. यामुळे अनेक काश्मिरी कुटुंब हलाखीच्या परिस्थितीमध्ये जगतात. आपल्या मुलांनी शांततेचं आयुष्य जगावं यासाठी चांगलं शिक्षण घ्यावं यासाठी कर्ज काढून आई वडील मुलांना इतर राज्यात पाठवतात. त्यांना इतर राज्य ,भारत आपला वाटतो म्हणूनच ते दुसऱ्या राज्यांत जातात. मग एका काश्मिरीच्या दुष्कृत्याची शिक्षा इतर निर्दोष व्यक्तींना कशासाठी?" नर्गिस पोटतिडकीने आणि काळजीच्या सुरात सध्याच्या परिस्थितीवर काश्मिरी विद्यार्थी आणि व्यावसायिकांवरील हल्ल्यविषयी बीबीसी मराठीशी बोलत होती.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)