6 वर्षांचा मुलगा 200 मीटर खोल बोअरवेलमध्ये पडला - आंबेगावातील घटना

  • हलिमा कुरेशी
  • बीबीसी मराठीसाठी, पुणे
पुणे
फोटो कॅप्शन,

आंबेगावमधील या बोअरवेलमध्ये 6 वर्षांचा मुलगा पडला आहे.

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव इथल्या थोरांदळे गावात एका बोअरवेलमध्ये 6 वर्षांचा मुलगा पडला आहे. या मुलाला या बोअरवेलमधून बाहेर काढण्यासाठी NDRFचं पथक रात्री गावात दाखल झालं आहे.

या मुलाचं नाव रवी पंडित असं आहे.

थोरांदळे इथं रस्त्याचं काम सुरू आहे. त्यासाठी काही बांधकाम मजूर तिथं राहण्यासाठी आली आहेत. सायंकाळी पाच सुमारास रवी घराबाहेर खेळत होता. खेळत असतानाच तो उघड्या बोअरवेलमध्ये पडला.

या बोअरवेलची खोली जवळपास 200 मीटर इतकी आहे. त्यात 10 मीटर इतक्या खोलीवर रवी अडकलेला आहे.

घटनास्थळी तातडीने पोलिसांना बोलवण्यात आलं. त्यानंतर NDRFच्या पथकाला संपर्क साधण्यात आला.

पोलीस आणि ग्रामस्थ बोरवेलच्या परिसरात थांबले आहेत. NDRFची पथक गावात पोहोचलं असून मदतकार्य सुरू झालं आहे.

हा मुलगा बोलत असून त्याचा आवाज ऐकू येत आहे, अशी माहिती घटनास्थळी उपस्थित असलेल्य एका ग्रामस्थाने दिली.

फोटो कॅप्शन,

मुलगा पडलेल्या बोअरवेलच्या बाजूला खड्डा पाडण्याचा प्रयत्न झाला.

फोटो कॅप्शन,

मुलगा बोअरवेलमध्ये पडलेल्या ठिकाणी ग्रामस्थांची गर्दी झाली आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)