नरेंद्र मोदी प्रोटोकॉल तोडणारे पहिलेच पंतप्रधान आहेत का?

  • फॅक्टचेक टीम
  • बीबीसी न्यूज
मोदी

फोटो स्रोत, Twitter@MEAINDIA

सौदीच्या राजाचं स्वागत करण्यासाठी मोदींनी शिष्टाचार मोडला असा आरोप काँग्रेसने केला आहे. सत्य परिस्थिती काय आहे ते जाणून घ्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सौदी अरेबियाचे राजे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांचा अलिंगन देतानांचा फोटो म्हणजे राजशिष्टाचार मोडल्याचा नमुना म्हणून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मोहम्मद बिन सलमान त्यांच्या दोन दिवसीय दौऱ्यावर मंगळवारी रात्री 10 वाजता दिल्लीला पोहोचले. त्यांचं स्वागत करण्यासाठी मोदी स्वत: विमानतळावर हजर होते.

भारतीय जनता पक्षाच्या टीकाकारांनी आणि काँग्रेसने मोदींनी केलेल्या या स्वागतावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

सौदीच्या राजाचं स्वागत करण्यासाठी राजशिष्टाचार मोडला या कॅप्शनसकट असलेला मोदींचा फोटो सध्या फेसबुक आणि ट्विटरवर व्हायरल झाला आहे.

काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंट आणि काँग्रेस प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी अशाच आशयाचं ट्वीट केलं आहे.

फोटो स्रोत, Twitter

ते म्हणतात, "राजशिष्टाचार मोडून सौदीच्या राजाचं असं स्वागत करण्यावरून असं दिसतं की मोदींना शहीदांची किती किंमत आहे. ज्या व्यक्तीचे ते स्वागत करत आहे त्यांनी काही तासांआधी पाकिस्तानला मोठी मदत देण्याचं आश्वासन दिलं होतं."

काही लोकांनी याच ट्विटचा आधार घेत सांगितलं की राजशिष्टाचार मोडून अशा पद्धतीने स्वागत करणारे मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत.

मात्र हा दावा खरा नाही. कारण 2004 ते 2014 च्या मध्ये काँग्रेस सरकारमध्ये पंतप्रधान असलेल्या मनमोहन सिंग यांनी हा प्रकार पाच वेळा केला आहे.

जेव्हा मनमोहन सिंह उभे होते स्वागताला

मनमोहन सिंह पाच वेळा परदेशी पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी शिष्टाचार मोडला आहे.

पहिल्यांदा तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी हा राजशिष्टाचार 2006 मध्ये सौदी अरेबियाचे राजे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांचे वडील सलमान बिन अब्दुल अजीज यांच्यासाठी हा शिष्टाचार मोडला होता.

फोटो स्रोत, Twitter

2006 मध्ये मनमोहन सिंह यांनी दुसऱ्यांदा हा राजशिष्टाचार मोडला आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांचं स्वागत करण्यासाठी ते विमानतळावर गेले होते.

2006 मध्ये नेपाळचे तत्कालीन पंतप्रधान सुशील कोईराला आणि 2013 मझध्ये जपानचे राजे अकिहितो यांच्या स्वागतासाठी मनमोहन सिंग यांनी हा तथाकथित राजशिष्टाचार मोडला आणि पाहुण्यांचं स्वागत करायला विमानतळावर घ्यायला गेले होते.

2010 मध्ये जेव्हा अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या स्वागतासाठी भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह त्यांची पत्नी गुरुशरण कौर यांच्याबरोबर दिल्ली विमानतळावर गेले होते.

राजशिष्टाचार आणि राजाचे स्वागत

बुधवारी सकाळी काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी #PulwamaTerrorAttack या हॅशटॅगबरोबर एक स्क्रीनशॉट शेअर केला आणि दावा केला की मोदींनी राजशिष्टाचार मोडला आहे. त्यात "परदेशी पाहुण्यांसाठीचा शिष्टाचार" असं लिहिलं आहे.

परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी बीबीसीला सांगितलं की काँग्रेस प्रवक्ता ज्या स्क्रीनशॉटचा त्या आधार घेत आहेत ते अधिकृत दस्तावेज नाही. सोशल मीडिया साईट Quora वर एका युजरने उत्तर दिलं आहे.

त्यांनी सांगितलं की अधिकृत पद्धतीने भारतात येणाऱ्या परदेशी पाहुण्यांच्या स्वागतासाठी राजशिष्टाचार काय आहे त्यासंबंधी माहिती परराष्ट्र मंत्रालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध नाही. कारण ती पद्धत गोपनीय दस्तावेजांच्या श्रेणीत येते.

फोटो स्रोत, Getty Images

याबाबतीत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही माजी मुत्सद्दी अधिकारी कृष्ण चंद्र सिंह यांच्याशी बातचीत केली. त्यांनी सांगितलं की परदेशी पाहुण्यांच्या स्वागतासाठी राजशिष्टाराच्या काही ठरलेल्या गोष्टी नाहीत.

त्यांच्या मते जे मोदी यांनी केलं आहे ते मनमोहन सिंग यांनीसुद्धा केलं आहे. मात्र या सरकारमध्ये पंतप्रधानांनी विमानतळावर जाऊन परदेशी पाहुण्यांचं स्वागत करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

के.सी.सिंह म्हणाले, "एखाद्या राष्ट्रप्रमुखाने परदेशी पाहुण्याचं स्वागत करायला जायचं की नाही हे तो पाहुणा किती महत्त्वाचा आहे यावर अवलंबून आहे. हे असं प्रत्येक वेळी करता येत नाही कारण प्रत्येक पाहुण्यासाठी असं केलं तर त्याचं महत्त्व राहणार नाही.

फोटो स्रोत, Getty Images

के.सी.सिंह यांनी परदेशी पाहुण्यांचं स्वागत इंदिरा गांधीच्या काळात माजी पंतप्रधान इंदिरा गांधीच्या अंतिम कार्यकाळात अतिशय अदबीने केलं जायचं. त्यावेळी सगळ्या पाहुण्यांसाठी पंतप्रधान विमानतळावर जायचे. त्यानंतर भारताचं महत्त्व आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढू लागलं. तेव्हा 90 च्या दशकात अगदी निवडक पाहुण्यांसाठी पंतप्रधान विमानतळावर जाऊ लागले जेणेकरून त्यांचं महत्त्व दिसेल.

के.सी सिंह यांच्या मते आदर्श स्थिती अशी आहे की पंतप्रधान राष्ट्रपती भवनात परदेशी पाहुण्यांची वाट पहावी कारण तिथेच त्यांचा स्वागत समारोह आयोजित केलेला असतो.

प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनुसार जवळजवळ पाच वर्षांच्या कार्यकाळात पंतप्रधान मोदी मनमोहन सिंग यांच्यापेक्षा जास्त वेळा विमानतळावर पोहोचले आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)