भाजप-शिवसेना युतीत मुख्यमंत्रीपदावरून वाद?--बीबीसी मराठी राउंड अप

Image copyright Getty Images

1. भाजप-शिवसेना युतीत मुख्यमंत्रीपदावरून वाद?

युती जाहीर होऊन दोन दिवसही उलटत नाही तर युती तोडण्याची भाषा शिवसेनेने केली आहे. बीबीसी मराठीशी बोलताना शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी म्हटलं आहे की शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद नाही मिळालं तर शिवसेना युती तोडू शकते. भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर टीका करताना ते बोलत होते. मुख्यमंत्रिपदावरून युतीमध्ये नवीन वाद सुरू होणार की अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद या फॉर्म्युल्यावर युती कायम राहणार? जाणून घेण्यासाठी इथं क्लिक करा.

2. 453 कोटी रूपये भरा, नाहीतर जेलमध्ये जाः अनिल अंबानींना सर्वोच्च न्यायालयाचा झटका

Image copyright Getty Images

सर्वोच्च न्यायालयानं रिलायन्स कम्युनिकेशनचे (आरकॉम) चेअरमन अनिल अंबानींना न्यायालयाच्या अवमाननेप्रकरणी दोषी ठरवलं आहे. एरिक्सन इंडियानं दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयानं हा निर्णय दिला आहे. चार आठवड्याच्या आत एरिक्सनला 453 कोटी रूपये देण्याचा आदेश दिला आहे. ही रक्कम न दिल्यास अनिल अंबानींना तीन महिन्यांचा तुरूंगवासही होऊ शकतो. सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा.

3. पुलवामा : महाराष्ट्रातील काश्मिरी मुलांना जवानांवरील हल्ल्यानंतर असुरक्षित वाटतं?

प्रतिमा मथळा नर्गिस आणि आयमन

"काश्मीरमध्ये रोजगाराच्या संधी नाहीत, शिक्षण घायचं तर काश्मिरच्या हवामानामुळे आणि सततच्या हिंसक घटनांमुळे पाच ते सहा महिने मिळतात. यामुळे अनेक काश्मिरी कुटुंब हलाखीच्या परिस्थितीमध्ये जगतात. आपल्या मुलांनी शांततेचं आयुष्य जगावं यासाठी चांगलं शिक्षण घ्यावं यासाठी कर्ज काढून आई वडील मुलांना इतर राज्यात पाठवतात. त्यांना इतर राज्य, भारत आपला वाटतो म्हणूनच ते जातात ना दुसऱ्या राज्यात. मग एका काश्मिरीच्या दुष्कृत्याची शिक्षा इतर निर्दोष व्यक्तींना कशासाठी?" काश्मिरमधील सध्याच्या परिस्थितीबद्दल पुण्यात राहणाऱ्या काश्मिरी तरूणींच्या भावना जाणून घेण्यासाठी हा रिपोर्ट वाचा.

4. अक्षय कुमारने पाकिस्तानचं समर्थन केल्याच्या व्हीडिओचं सत्य काय?

Image copyright Getty Images

कट्टरवाद हा पाकिस्तानात नाही तर भारतात आहे असं सांगणारा अभिनेता अक्षय कुमार यांचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर #BoycottAkshayKumar हॅशटॅग ट्रेंड केला जातोय. ट्वीटरवर अनेक लोक हा व्हीडिओ शेअर करत आहेत आणि अक्षयकुमार देशद्रोही असल्याची टीकाही होत आहे. इतकंच नाही तर अक्षय कुमार यांच्यावर बहिष्कार घालण्याचं आवाहनही सोशल मीडियावर केलं जातंय. नेमकं काय म्हणाले होते अक्षय कुमार? या व्हीडिओमागचं वास्तव जाणून घेण्यासाठी क्लिक करा.

5. मोहम्मद बिन सलमान : सौदीत 'महिलांना हक्क देणारा' आणि 'विरोधकांना चिरडणारा' तेलसम्राट

Image copyright Getty Images

सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान अल् सौद भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. पुलवामा इथं झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या दौऱ्याला मोठं महत्त्व आलं आहे. जगातील आघाडीच्या तेलउत्पादक राज्याचे युवराज या नात्याने त्यांचा दौरा आर्थिक तसेच राजकीय पातळीवर विशेष महत्त्वाचा ठरणार आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने त्यांच्या कारकिर्दीचा हा आढावा.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)