पुलवामा: काश्मिरी विद्यार्थ्यांना युवासेनेकडून मारहाण #बीबीसी मराठी राउंडअप

काश्मिरी विद्यार्थी

फोटो स्रोत, Nitesh raut/bbc

बीबीसी मराठीच्या महत्त्वाच्या बातम्या एका दृष्टिक्षेपात.

1. पुलवामा: काश्मिरी विद्यार्थ्यांना 'युवासेनेकडून मारहाण' #बीबीसी मराठी राउंडअप

काश्मीरच्या पुलवामामध्ये 14 फेब्रुवारीला CRPFच्या तुकडीवर झालेल्या हल्ल्यानंतर काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाणीच्या काही बातम्या देशभरातून येत आहेत. यवतमाळमध्येही चार विद्यार्थ्यांना मारहाणीची घटना गुरुवारी समोर आली आहे.

शिक्षणासाठी जम्मू-काश्मीरहून यवतमाळमध्ये आलेल्या चार विद्यार्थ्यांना युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. याप्रकरणी लोहारा पोलिस ठाण्यात 10 ते 12 कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

युवासेनेनं या घटनेचा निषेध करत कारवाई करणार असल्याचं म्हटलं आहे. पण हे कार्यकर्ते मनसेमधून युवासेनेमध्ये आलेले स्वयंघोषित युवासैनिक असल्याचं यवतमाळ शिवसेनेचा दावा आहे.

संपूर्ण वृत्त येथे ववाचा.

2. मनसे नेते नितीन नांदगावकर यांना का बजावण्यात आलीये तडीपारीची नोटीस?

फोटो स्रोत, Nitin nandgaokar @facebook

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते नितीन नांदगावकर यांना मुंबई पोलिसांनी दोन वर्षे तडीपारची नोटीस बजावली आहे.

परप्रांतीय रिक्षाचालकांकडून प्रवाशांची होणारी अडवणुकीविरोधात नांदगावकरांकडून नेहमी आक्षेप घेतला जायचा. मात्र रिक्षाचालकांची दादागिरी उघड करताना नांदगावकर यांनी कायदा हाती घेतला असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

नांदगावकर यांच्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असल्याचा ठपका पोलिसांनी नांदगावगावकर यांच्यावर ठेवला आहे.

निराधार आरोप ठेवून पोलिसांनी मुंबई, उपनगरं आणि पालघर जिल्ह्यातून तडीपार करण्याची कारवाई माझ्यावर करण्यात आली असल्याचं नितीन नांदगावकर यांनी म्हटलं आहे. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा.

3. पुलवामा हल्ल्याची बातमी कळली, तेव्हा मोदी प्रचारासाठीच्या शूटिंगमध्ये व्यग्र होते - काँग्रेस

फोटो स्रोत, Getty Images

पुलवामात कट्टरवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 40 जवानांनी प्राण गमावले. देश शोकात होता, त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या प्रचार, प्रसारासाठीच्या व्हीडिओ शूटिंगमध्ये व्यग्र होते, असा गंभीर आरोप काँग्रेसनं केलाय.

काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी थोड्याच वेळापूर्वी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि भाजपच्य नेत्यांवर टीकास्त्र डागलं.

पुलवामातील अंवतिपुरा भागात 2500 CRPF जवानांची तुकडी रस्त्याच्या मार्गे जात होती. त्यावेळी स्फोटकांनी भरलेल्या एका कारनं सीआरपीएफ जवानांच्या बसला धडक दिली. ज्यात 40 जवानांनी प्राण गमावले. संपूर्ण बातमी इथं वाचा.

4. पुणे: आंबेगावच्या बोअरवेलमध्ये 16 तास अडकलेल्या रवी पंडितला असं बाहेर काढण्यात आलं

फोटो स्रोत, Halima Qureshi

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव इथल्या थोरांदळे गावात एका बोअरवेलमध्ये पडलेल्या 6 वर्षांचा रवीला तब्बल 16 तासानंतर सुखरूपणे बाहेर काढलं.

बुधवारी सांयकाळी 4.30 रवी उघड्या बोअरवेलमध्ये पडला होता. त्याला गुरुवारी सकाळी 9 वाजता रवीला बाहेर काढलं. तब्बल 16 तास हे बचावकार्य चाललं आहे.

बोअरवेलमधून बाहेर काढण्यासाठी बुधवारी रात्री 8 वाजता NDRFचं पथक थोरांदळे गावात दाखल झालं होतं.

सध्या रवीची आरोग्य तपासणी करण्यासाठी जवळच्या मंचर इथल्या सरकारी दवाखाना हलवण्यात आलं आहे. हा रिपोर्ट तुम्ही इथं वाचू शकता.

5. पुलवामा: पाकिस्तान सरकारने हाफीज सईदच्या जमात-उद-दावावर बंदी घातली

फोटो स्रोत, Getty Images

2008 मुंबई हल्ल्याचा मुख्य सूत्रधार असलेला हाफीज सईद याच्या जमात-उद-दावा आणि त्याची धर्मादाय संस्था फलह-ए-इन्सानियत या संघटनांवर पाकिस्तान सरकारने बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक गुरुवारी झाली. "त्यामध्ये पाकिस्तान पंतप्रधान कार्यलयाने राष्ट्रीय सुरक्षा आराखड्याचा मागोवा घेतला. जमात-उद-दवा आणि फलह-ए-इन्सानियत फाऊंडेशनला गृहमंत्रालयानं बेकायदेशीर ठरवल्याचं या बैठकीत निश्चित करण्यात आलं," असं पाकिस्तान सरकारने एका प्रसिद्धिपत्रकात जाहीर केलं आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान या बैठकीचे निर्णय पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफच्या ट्विटर हॅंडलवरून जाहीर केले.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)