नॅशनल वॉर मेमोरियलबद्दल तुम्हाला हे माहिती आहे का?

फोटो स्रोत, EPA
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीमध्ये नॅशनल वॉर मेमोरियलचं उद्घाटन केलं. मात्र त्यावेळेसही काँग्रेस आणि गांधी परिवारावर टीका करायला ते विसरले नाहीत.
काँग्रेस आणि गांधी परिवाराने सैन्याची कधीही पर्वा केली नाही. राष्ट्र आधी की परिवार आधी याचा विचार देशाने करण्याची वेळ आली आहे.
यानिमित्ताने नॅशनल वॉर मेमोरियलबद्दल आम्ही काही खास मुद्दे सांगत आहोत-
नॅशनल वॉर मेमोरियल हे नवी दिल्लीमध्ये इंडिया गेट परिसरात बांधण्यात आलं आहे.
फोटो स्रोत, Reuters
विविध युद्धांमध्ये मारल्या गेलेल्या भारतीय सैनिकांच्या स्मृतिसाठी हे स्मृतिस्थळ उभारण्यात आलं आहे.
अमर जवान ज्योतीजवळ 40 एकर परिसरात पसरलेल्या या स्मृतिस्थळासाठी 176 कोटी रूपयांचा निधी लागला आहे.
नॅशनल वॉर मेमोरियलमध्ये अमर जवान ज्योतीप्रमाणे एक सतत तेवत राहाणारी ज्योत ठेवण्यात येणार आहे.
फोटो स्रोत, EPA
इथल्या 16 भिंतींवर 1962 नंतर आतापर्यंत विविध युद्धांमध्ये मारल्या गेलेल्या 25,942 सैनिकांची नावं लिहिण्यात आली आहेत.
महाभारतातल्या चक्रव्यूहाप्रमाणे इथं चार चक्रं बनवण्यात आली आहेत. अमर चक्र, वीरता चक्र, त्याग चक्र, रक्षक चक्र अशी त्यांची नावं आहेत.
फोटो स्रोत, Reuters
याशिवाय या मेमोरियलमध्ये राम सुतार यांनी तांब्यापासून बनवलेली सहा म्युरल्स लावण्यात आली आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)