लोकसभा 2019: प्रकाश आंबेडकरांच्या बहुजन वंचित आघाडीचे 37 उमेदवार जाहीर

वंचित आघाडी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस Image copyright Getty Images

प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन औवेसी यांच्या वंचित बहुजन आघाडीची 37 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी यादी जाहीर केली आहे. समाजातील वेगवेगळ्या जाती-धर्माच्या लोकांना वंचित आघाडीने उमेदवारी जाहीर केली आहे. या यादीत उमेदवाराच्या नावापुढे त्या व्यक्तीच्या जातीचा किंवा धर्माचा उल्लेख केला आहे.

Image copyright BVA

धनगर, कुणबी, भिल्ल, बौद्ध, कोळी, वडार, लोहार, वारली, बंजारा, मुस्लीम, माळी, कैकाडी, धिवर, मातंग, कोळी, आगरी, शिंपी, लिंगायत, वारली आणि मराठा अशा विविध समाजातील लोकांना उमेदवारी देण्यात आली आहे. 37 जणांच्या यादीत चार महिलांचा समावेश आहे. दोन मुस्लीम आहेत. डॉ. अनिल कुमार आणि डॉ. संजय भोसले यांच्या नावासमोर त्यांच्यासमोर नाहीत.

Image copyright BVA

मावळमध्ये पार्थ पवार यांच्याविरोधात राजाराम पाटील उभे आहेत. सुप्रिया सुळे यांच्याविरोधात नवनाथ पडळकर उभे आहेत. परभणी येथे राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश विटेकर यांच्याविरोधात MIMचे आलमगीर खान अखिल मोहम्मद खान उभे राहतील.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)