प्रकाश आंबेडकर : लढाई जातीअंतासाठी आहे तर उमेदवारांच्या नावासमोर जात कशासाठी? बीबीसी मराठी राऊंड अप

प्रकाश आंबेडकर Image copyright Facebook@Prakash Ambedkar

बीबीसी मराठीवर प्रकाशित झालेल्या पाच महत्त्वाच्या बातम्या :

1.प्रकाश आंबेडकर: 'लढाई जातीअंतासाठी आहे तर उमेदवारांच्या नावासमोर जात कशासाठी?'

बहुजन वंचित आघाडीने आपल्या 37 उमेदवारांची यादी जाहीर केली. उमेदवाराच्या नावासमोर जातींचा उल्लेख करण्यात आला आहे. 'तुमचा लढा हा जातीअंतासाठी आहे तर उमेदवारांच्या नावासमोर जातींचा उल्लेख कशासाठी,' असा प्रश्न विचारला जात आहे.

या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी बीबीसीनं बहुजन वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची मुलाखत घेतली तेव्हा ते म्हणाले,

"याआधी मराठ्यांशिवाय इतर कुणाला उमेदवारी दिलीच जायची नाही. म्हणून ते जाहीर करण्याची वेळच येत नसे. हे गृहीतच धरलं जायचं की उमेदवार मराठाच आहे."

ही संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

2. लोकसभा 2019 : राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर

राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. आधीपासून चर्चा सुरू असल्याप्रमाणे पार्थ पवार यांना मावळमधून तिकीट देण्यात आले आहे. त्याबरोबरच समीर भुजबळ यांना नाशिकमधून उमेदवारी देण्यात आली आहे.

Image copyright Getty Images

आज जाहीर झालेल्या यादीमध्ये मावळ आणि नाशिकसह दिंडोरी, शिरूर आणि बीड मतदारसंघांसाठी उमेदवारही घोषित करण्यात आले.

ही संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

3. बालाकोट हल्ल्यात 200 जणांचा मृत्यू झाल्याचं पाकिस्तानच्या कर्नलनं मान्य केलं? - फॅक्ट चेक

बालाकोट हल्ल्यात 200 जणांचा मृत्यू झाल्याच्या एका व्हायरल व्हीडिओचा आधार घेत केंद्रीय मंत्र्यानं ट्वीट केलं आहे. यात किती तथ्य आहे?

भारतातल्या अनेक न्यूज चॅनल्सनी हा व्हीडिओ या दाव्यासहित दाखवला आहे की, बालाकोट हल्ल्यात 200 जण मृत्युमुखी पडल्याची बाब पाकिस्तानच्या लष्करातील अधिकाऱ्यानं स्वीकारली आहे.

Image copyright SM Viral post

टीव्हीवर यायच्या अगोदर हा व्हीडिओ आम्हाला सोशल मीडियावर शेअर होताना दिसला होता. भारतीय वायुसेनेच्या बालाकोट हल्ल्याचा पुरावा, अशा कॅप्शनसहित फेसबुकवरील काही ग्रुप्समध्ये या व्हीडिओला शेअर करण्यात आलं आहे. ही संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

4. CST ब्रिज दुर्घटना : 'एकाही राजकारण्याला मुंबईच्या नियोजनाचं काडीचंही ज्ञान नाही'

पूल पडला, पूर आला, चेंगराचेंगरी झाली, रेल्वेची धडक, बॉम्बस्फोट, दहशतवादी हल्ला, झोपड्यांना आग, खड्ड्यांमध्ये पडणे ही सगळी कारणं मुंबईकरांचा दररोज जीव घेणारी आहेत. यापैकी काहीही घडलं तर एकमेकांकडे बोट दाखवण्यासाठी वेगवेगळी प्रशासनं तत्पर असतात.

Image copyright BBC Sport

राजकारणी लोकांनी प्रशासकांकडे बोट दाखवण्याची पद्धतही मुंबईकरांसाठी नवी नाही. त्यामुळे मुंबईकरांचं आयुष्य आता खरोखर स्वस्त झालं आहे का, असा प्रश्न विचारला जात आहे. ही बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

5. ब्रेक्झिट : घटस्फोट तडकाफडकी होणार की पुढे ढकलला जाणार?

Image copyright EPA

पंतप्रधान थेरेसा मे यांनी ब्रेक्झिटला विलंब करण्यासाठी युरोपियन युनियनला विनंती करावी, असा ठरवा ब्रिटिश संसदेने मंजूर केला आहे. 413 विरुद्ध 202 मतांनी हा ठरवा संमत झाला आहे. पूर्वीच्या नियोजनानुसार ब्रेक्झिट 29 मार्च रोजी अपेक्षित होतं. ते आता पुढं ढकललं जाईल.

मे म्हणाल्या, "पुढील आठवड्यात माझ्या प्रस्तावाला खासदारांनी पाठबळ दिलं तर ब्रेक्झिट 30 जूनपर्यंत प्रलंबित होईल." जर खासदारांनी हा प्रस्ताव फेटाळला तर अधिक काळासाठी ब्रेक्झिट प्रलंबित व्हावं यासाठी प्रयत्न करू, असं त्या म्हणाल्या आहेत. ही संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)