गोवा : मनोहर पर्रिकरांचे सरकार बरखास्त करण्याची काँग्रेसची मागणी - बीबीसी मराठी राऊंड अप

मनोहर पर्रिकर Image copyright Getty Images

बीबीसी मराठीवर प्रकाशित झालेल्या पाच महत्त्वाच्या बातम्या पुढीलप्रमाणे:

1. गोवा: मनोहर पर्रिकरांचे सरकार बरखास्त करा, काँग्रेसची राज्यपालांकडे मागणी

गोव्यामध्ये मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचं सरकार बरखास्त करून सत्ता स्थापनेसाठी आपल्याला संधी द्यावी अशी मागणी काँग्रेसने गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा यांना पत्र लिहून केली आहे.

गोवा विधानसभेतील विरोधी पक्षनेते चंद्रकात कवळेकर यांनी आज सत्ता स्थापनेचा दावा करणारं पत्र राज्यपालांकडे दिलं आहे. यामध्ये सत्ताधारी भाजपचे सदस्य फ्रान्सीस डिसूझा यांचे निधन झाल्यामुळे भारतीय जनता पार्टीचे विधानसभेतील संख्याबळ कमी झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

ही संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

2. लोकसभा निवडणूक: सुशीलकुमार शिंदे 77व्या वर्षी मैदानात का उतरले?

सोलापूर लोकसभा मतदार संघातून काँग्रेसचा उमेदवार म्हणून सुशील कुमार शिंदे यांचं नाव घोषित झालं आणि राजकीय चर्चेला उधाण आलं. 77व्या वर्षी शिंदे यांना निवडणुकीत का उभं करण्यात येत आहे असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.

Image copyright Getty Images

काँग्रेसकडे पर्यायच नाही का अशी देखील चर्चा आहे. ही संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे येथे क्लिक करा.

3. लोकसभा निवडणूक 2019 : प्रियंका गांधींची गंगा यात्रा काँग्रेसचं नशीब बदलवणार?

Image copyright Getty Images

काँग्रेस सरचिटणीस आणि पूर्व उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियंका गांधी निवडणूक प्रचाराची सुरुवात प्रयागराज म्हणजे अलाहाबादमधून करणार आहेत.

त्या 18 ते 20 मार्च दरम्यान प्रयागरागपासून वाराणसीपर्यंत गंगा नदी मार्गातून यात्रा करतील. यादरम्यान त्यांचे इतरही कार्यक्रमही होतील.

प्रियंका गांधींच्या या दौऱ्यामुळे काँग्रेस पक्षात उत्साहाचं वातावरण आहे. तसंच या दौऱ्याला काही सांस्कृतिक संदर्भही आहेत. ही संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

4. CSMT दुर्घटना : 'एल्फिन्सटन' चेंगराचेंगरीनंतर मुंबईत खरंच काही बदललं का?

मुंबईला स्वप्नांचं शहर म्हटलं जातं. कधीही न थांबणाऱ्या या शहरात स्वप्नांचा कधी चुराडा होईल आणि मुंबईने दाखवलेली स्वप्नं कधी दुःस्वप्नात बदलतील हे कुणीच सांगू शकत नाही. काल CSMT जवळ कोसळलेल्या पादचारी पुलाने 5 जणांचे बळी घेतले. रेल्वे क्राँसिंग आणि स्टेशनवरील पुलांचं काम युद्ध पातळीवर सुरू असलं तरी CSMTची दुर्घटना हा निष्काळजीपणा होता आणि तो टाळता आला असता, अशी प्रतिक्रिया खासदार राहुल शेवाळे यांनी दिली आहे.

Image copyright Getty Images

ही संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

5. #Christchurch: हल्ल्याचा व्हीडिओ कसा झाला व्हायरल?

न्यूझीलंडच्या क्राइस्टचर्च येथे दोन मशिदींवर झालेल्या हल्ल्यात 49 जण मृत्युमुखी पडले आणि 20हून अधिक लोक जखमी झाले. या हल्ल्यातील संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आलं.

Image copyright Getty Images

मुख्य संशयित हा 28 वर्षीय ऑस्ट्रेलियन नागरिक आहे. त्याचं नाव ब्रेंटन टॅरंट आहे. या घटनेची सर्वांत धक्कादायक बाब म्हणजे संशयितांनी या घटनेचं फेसबुक लाइव्ह केलं होतं. ही संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)