लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची यादी: मोदी वाराणसीतून, अमित शाहांनी कापलं अडवाणींचं तिकीट, महाराष्ट्रातली 16 नावं

शाह, मोदी, गडकरी Image copyright Getty Images

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर झाली आहे. यात 182 उमेदवारांचा समावेश आहेत. अपेक्षप्रमाणे वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा उभे राहणार आहेत.

  • गांधीनगरमधून भाजप अध्यक्ष अमित शाह निवडणूक लढवणार आहे. गांधीनगरमधून यापूर्वी लालकृष्ण अडवाणी या मतदारसंघातून निवडणूक लढवायचे.
  • नितीन गडकरी नागपूरमध्ये निवडणूक लढवणार आहेत. त्यांचा मुकाबला काँग्रेसच्या नाना पटोलेंशी होणार आहे.
  • लखनौमधून गृहमंत्री राजनाथ सिंह निवडणूक लढवणार आहेत.
  • अमेठीतून स्मृती इराणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींविरोधात लढणार आहेत.
  • मथुरामधून हेमा मालिनी निवडणूक लढवणार आहेत.
  • लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि अनेक ज्येष्ठांना घरी बसवलं जाईल, अशी शक्यता माध्यमांमधून व्यक्त होत आहे.
  • काँग्रेसने आतापर्यंत सहा याद्या प्रसिद्ध केल्या आहेत.


महाराष्ट्रातली 16 नावं जाहीर

महाराष्ट्रातली 16 नावं जाहीर करण्यात आली आहेत. त्यात दोन विद्यमान खासदारांची तिकिटी कापण्यात आली आहेत. अहमदनगरचे दिलीप गांधी आणि लातूरचे सुनील गायकवाड यांची तिकिटं कापण्यात आली आहेत.

ईशान्य मुंबईमधून किरिट सौमय्या यांचं नाव पहिल्या यादीत नसल्यामुळे अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत.

मतदार संघ उमेदवार टिप्पणी
अहमदनगर सुजय विखे पाटील नुकतेच काँग्रेसमधून भाजपात आले आहेत.
नागपूर नितीन गडकरी विद्यमान खासदार आहेत.
रावेर रक्षा खडसे विद्यमान खासदार आहेत.
नंदुरबार हिना गावित विद्यमान खासदार आहेत.
धुळे सुभाष भामरे विद्यमान खासदार आहेत.
जालना रावसाहेब दानवे विद्यमान खासदार आहेत.
भिवंडी कपिल पाटील  विद्यमान खासदार आहेत.
मुंबई उत्तर गोपाळ शेट्टी विद्यमान खासदार आहेत.
मुंबई उत्तर मध्य पूनम महाजन विद्यमान खासदार आहेत.
बीड डॉ. प्रीतम मुंडे विद्यमान खासदार आहेत.
अकोला संजय धोत्रे विद्यमान खासदार आहेत.
वर्धा रामदास तडस विद्यमान खासदार आहेत.
गडचिरोली अशोक महादेवराव नेते विद्यमान खासदार आहेत.
चंद्रपूर हंसराज अहिर विद्यमान खासदार आहेत.
लातूर डॉ. सुधाकर शृंगारे सध्या जिल्हा परिषद सदस्य आहेत.
सांगली संजय काका पाटील विद्यमान खासदार आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)