लोकसभा निवडणूक 2019: शिवसेनेच्या 21 उमेदवारांची यादी जाहीर

उद्धव ठाकरे Image copyright TWITTER/UDDHAV THACKERAY

लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनं 21 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्रात लोकसभेला भाजप 25 आणि शिवसेना 23 जागा लढवणार आहे.

मतदारसंघनिहाय उमेदवारांची यादी खालीलप्रमाणे -

1) दक्षिण मुंबई - अरविंद सावंत

2) दक्षिण मध्य मुंबई - राहुल शेवाळे

3) उत्तर पश्चिम मुंबई - गजानन कीर्तीकर

4) ठाणे - राजन विचारे

5) कल्याण - श्रीकांत शिंदे

6) कोल्हापूर - संजय मंडलिक

7) हातकणंगले - धैर्यशील माने

8) नाशिक - हेमंत गोडसे

9) शिर्डी - सदाशिव लोखंडे

10) शिरूर- शिवाजीराव आढळराव-पाटील

11) औरंगाबाद - चंद्रकांत खैरे

12) बुलढाणा - प्रतापराव जाधव

13) रामटेक - कृपाल तुमाणे

14) अमरावती - आनंदराव अडसूळ

15) परभणी- संजय जाधव

16) मावळ - श्रीरंग बारणे

17) उस्मानाबाद - ओमराजे निंबाळकर

18) हिंगोली - हेमंत पाटील

19) यवतमाळ - भावना गवळी

20) रायगड - अनंत गीते

21) सिंधुदुर्ग-रत्नागिरी - विनायक राऊत

उस्मानाबादचे विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांच्याऐवजी ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

भाजपनं 21 मार्चला लोकसभेसाठी राज्यातील 16 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे आज 22 मार्चला शिवसेनेनं उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. 

सातारा आणि पालघर या दोन मतदारसंघातील उमेदवारांची नावं रविवारी जाहीर करण्यात येईल, असं शिवसेनेचे नेते आणि महाराष्ट्राचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, युती झाली नसती तर दोन्ही पक्ष नेस्तनाबूत झाले असते, असं वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत केलं होतं. 

"देशासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. मतभेद असले तरी आमच्या काही भूमिका आणि मागण्या आहेत. युती झाली नसती तर दोन्ही पक्ष नेस्तनाबूत झाले असते. ज्या मुद्द्यांसाठी भांडलो त्यावर भाजपनं तोडगा काढण्याचा प्रयत्न केला, म्हणून युती केली," असं त्यांनी म्हटलं होतं. 

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)