'नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्याकडून अडवाणी युगाचा अंत #बीबीसी मराठी राउंडअप

Image copyright Getty Images

1. 'नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्याकडून अडवाणी युगाचा अंत'

लोकसभा निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाने पहिली यादी जाहीर केली. गुजरातमधील गांधीनगर या मतदारसंघातून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह निवडणूक लढवणार आहेत. हा मतदारसंघ भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी यांचा बालेकिल्ला. अडवाणींना गांधीनगरमधून तिकीट नाकारून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह जोडीने त्यांच्या राजकीय कारकीर्दीला पूर्णविराम दिला आहे का? वाचा सविस्तर विश्लेषण.

2. लोकसभा 2019: 'मी पात्र असतानाही मला माझ्याच देशात सन्मानाची नोकरी का नाही?'

"एवढा पैसा खर्च करून, आईवडिलांच्या डोक्यावर कर्ज करून मी परदेशात जाऊ आणि का तर परक्यांची धुणीभांडी करायला?"

18 वर्षांची ननिता सोहेल तावातावात बोलत असते आणि माझ्या डोळ्यासमोर अनेक चेहरे सर्रकन सरकतात - नोकरी नसलेल्यांचे, त्यासाठी आंदोलन करणाऱ्यांचे, घरच्यांच्या जीवावर किती दिवस जगायचं म्हणून एकवेळ न जेवणाऱ्यांचे, उच्चशिक्षण घेऊनही नोकरी नाही म्हणून लहानसहान काम करणाऱ्या अनेकांचे. वाचा संपूर्ण बातमी.

3. वितळणाऱ्या हिमनद्यांमुळे एव्हरेस्टवर सापडत आहेत गिर्यारोहकांचे मृतदेह

एव्हरेस्ट शिखरावर हिमनद्या वितळत असल्याने तिथं गिर्यारोहकांचे मृतदेह सापडत आहेत. हे शिखर सर करण्यासाठी पहिली मोहीम हाती घेतल्यानंतर आजवर तिथं 300 गिर्यारोहकांचा मृत्यू झाला आहे. यातील दोन तृतीयांश मृतदेह बर्फाखाली गाडले गेले आहेत.

वसंत ऋतू सुरू झाल्याने या शिखराच्या चीनच्या बाजूच्या दिशेने मृतदेह काढण्याचे काम सुरू करण्यात आलं आहे. आतापर्यंत 4,800 गिर्यारोहकांनी हे जगातील सर्वोच्च शिखर सर केलं आहे. वाचा संपूर्ण बातमी

4. प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला 'साधनं' कुठून मिळतात? - रामदास आठवले

प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या वंचित बहुजन आघाडीचा निवडणुकीमध्ये नक्की कोणत्या पक्षांना फटका बसेल, याबद्दल सर्वांनाच कुतुहल आहे.

बीबीसी मराठीने आयोजीत केलेल्या राष्ट्रमहाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये वंचित बहुजन आघाडीतर्फे प्रकाश आंबेडकर यांनी तर यावर चर्चा केलीच, शिवाय, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही या आघाडीबद्दल त्यांचं मत व्यक्त केलं. काय म्हणाले रामदास आठवले ते या ठिकाणी वाचा.

5. न्यूझीलंड: ख्राइस्टचर्च मशीद हल्ल्यात गेलेल्या भारतीयांच्या मन हेलावून टाकणाऱ्या कथा

जगाच्या पार एका कोपऱ्यात असणारा न्यूझीलंड देश अनेक लोकांना नवं आयुष्य सुरू करायला सुरक्षित वाटतो. पण गेल्या शुक्रवारी दुपारी 1 वाजून 40 मिनिटांनी एका व्यक्तीने केलेल्या बेछूट गोळीबारामुळे हा समज गळून पडला आहे.

Image copyright Nurphoto/getty

"एका सुंदर देशामध्ये आपल्या मुलांना वाढवता येईल या कल्पनेने मी अत्यंत आनंदी होते परंतु (या हल्ल्यामुळे) मनाला अत्यंत वेदना झाल्या असं या हल्ल्यातून बचावलेले," मझरुद्दिन सय्यद अहमद यांनी सांगितलं. या कथा तुम्ही या ठिकाणी वाचू शकता.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)