अशोक चव्हाणांच्या ऑडिओ क्लिपचा नेमका अर्थ काय? : बीबीसी मराठी राऊंड अप

अशोक चव्हाण Image copyright Twitter

बीबीसी मराठीवर प्रकाशित झालेल्या पाच महत्त्वाच्या बातम्या खालीलप्रमाणे:

1. लोकसभा: अशोक चव्हाणांची व्हायरल झालेली क्लिप काँग्रेस हायकमांडला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न?

महाराष्ट्र काँग्रेसमधले अंतर्गत वाद आता जाहीरपणे ऐकायला मिळत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि चंद्रपूर येथील एक काँग्रेस कार्यकर्ता यांच्यामधली संभाषणाची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

ही ऑडिओ क्लिप खरी आहे की खोटी हे आम्ही अशोक चव्हाणांना विचारलं. ती क्लिप खरी असल्याचं मान्य करत ते म्हणाले, "एखाद्या कार्यकर्त्याशी बोलणं, त्याच्या भावना समजून घेणं हे अध्यक्ष म्हणून माझं काम आहे. दोन्ही लोकांमध्ये झालेलं खासगी संभाषण जाहीर कसं होऊ शकतं, हे मला समजत नाहीये. मी असं काही जाहीर भाषणात बोललेलो नाही."

ही संपूर्ण बातमी वाचण्याासाठी इथे क्लिक करा

2. लोकसभा 2019 : पुण्यात बापट विरुद्ध कोण? भाजपने दाखवला अनिल शिरोळेंना 'कात्रजचा घाट'

पुणे लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांना डावलण्यात आलं असून अन्न, नागरी पुरवठा मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांना तिकीट देण्यात आलं आहे. पुणे हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा मतदारसंघ असल्याने इथल्या लढतीकडं राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे.

Image copyright Facebook

अनिल शिरोळे फारसे सक्रिय नसल्यामुळे त्यांचं तिकीट कापण्यात आलं, त्याचवेळी गिरीश बापट यांनी आपल्या कार्यशैलीने छाप टाकण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही काँग्रेसचा उमेदवार कोण असेल हे गुलदस्त्यात आहे. ही संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

3. लोकसभा 2019: काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत राजू शेट्टी आल्याने कुणाला जास्त फायदा?

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या 'संयुक्त पुरोगामी महाआघाडी'ची घोषणा शनिवारी करण्यात आली. यात राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह शेतकरी कामगार पक्ष, बहुजन विकास आघाडी, युवा स्वाभिमान पक्ष, पीपल्स रिपब्लिकन पक्ष आणि इतर काही पक्ष आणि संघटना मिळून एकूण 56 घटक आहेत, असं यावेळी सांगण्यात आलं.

महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ही पत्रकार परिषद घेतली, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार, छगन भुजबळ आणि राजू शेट्टींसह अनेक नेते यावेळी उपस्थित होते. ही संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

4. नरेंद्र मोदी यांच्यावरील सिनेमात जावेद अख्तर, समीर यांची नावं कशी आली?

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या "जीवनावर आधारित" 'पीएम नरेंद्र मोदी' या सिनेमाचा ट्रेलर दोन दिवसांपूर्वी आला. विवेक ओबेरॉय त्यात मुख्य भूमिकेत आहेत, जे मोंदींच्या आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यात वेगवेगळ्या रूपात दिसत आहेत.

Image copyright facebook

पण ऐन निवडणुकांच्या तोंडावर आलेल्या या सिनेमामुळे वादळ तर उठणारच होतं. दिग्दर्शक ओमंग कुमार यांनी आधीच सांगितलं होतं की हा प्रपोगंडा सिनेमा आहे की नाही, हे तुम्हीच ठरवायचं.

विरोधी पक्षांनीही या बायोपिकच्या रिलीजच्या मुहूर्ताबद्दल आक्षेप नोंदवला आहे. हा सिनेमा 5 एप्रिलला देशभरात प्रदर्शित होत आहे, तर देशभरात 11 एप्रिल ते 19 मे दरम्यान मतदान होत आहे. ही संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

5. उत्तर कोरियावरील अतिरिक्त निर्बंध ट्रंप यांनी हटवले

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी उत्तर कोरियावरील नुकतेच लावलेले निर्बंध हटवले आहेत.

याबद्दल त्यांनी शुक्रवारी ट्वीट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी अमेरिकेच्या ट्रिझरीने लावलेल्या अतिरिक्त निर्बंधांचा उल्लेख आहे.

गुरुवारी अमेरिकेच्या ट्रिझरीने चीनमधील दोन शिपिंग कंपन्यांवर निर्बंध लादले होते. अमेरिकेने उत्तर कोरियावर लावलेल्या निर्बंधांचं उल्लंघन केल्याने या शिपिंग कंपन्यांवर कारवाई करण्यात आली होती. ही संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)