प्रतीक पाटील यांचा काँग्रेसला रामराम, पण वसंतदादा घराण्याची अधोगती कुणामुळे? - बीबीसी मराठी राऊंड अप

प्रतीक पाटील Image copyright BBC/Swati Patil

बीबीसी मराठीच्या महत्त्वाच्या बातम्यांचा राऊंड-अप असा

1. प्रतीक पाटील यांचा काँग्रेसला रामराम, पण वसंतदादा घराण्याची अधोगती कुणामुळे?

माजी केंद्रीय मंत्री आणि सांगलीचे माजी खासदार प्रतीक पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकेकाळचे दिग्गज नेते वसंतदादा पाटील यांचे नातू असलेले प्रतीक पाटील यांचा हा निर्णय म्हणजे सांगलीतील काँग्रेसची आणि दादा घरण्याच्या अधोगतीचे निदर्शक आहे. वाचा सविस्तर विश्लेषण.

2. 'शरद पवारांना मात्र आता भाजपमध्ये घेऊ नका': उद्धव ठाकरे

शिवसेना भाजप युतीच्या प्रचाराचा प्रारंभ कोल्हापुरातून झाला. काँग्रेसचे बडे नेते शिवसेना भाजपमध्ये प्रवेश करत आहेत, पण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पक्षात घेऊन नका, अशी टीका यावेळ उद्धव ठाकरे यांनी केली.

Image copyright TWITTER / DEV_FADNAVIS

तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "15 वर्षांत जी कामं झाली नाहीत ती कामं 5 वर्षांत झाली आणि पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक निधी दिला आहे." सविस्तर बातमी इथं वाचा.

3. काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला नाही, कधी करणारही नाही' - सपना चौधरी

"मी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला नाही आणि ना भविष्यात कधी प्रवेश करेन," असं सपना चौधरी यांनी स्पष्ट केलं आहे. सविस्तर बातमी इथं वाचा.

4. मनोहर पर्रिकर यांचे भाऊ किराणा मालाचं दुकान चालवतात?

भारताचे माजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला जात आहे. मनोहर पर्रिकर यांचे भाऊ गोव्यामध्ये एक साधं किराणा मालाचं दुकान चालवतात असं त्यात म्हटलं आहे. पण वस्तुस्थिती काय आहे ते जाणून घेण्यासाठी इथं क्लिक करा.

5. अखेर इस्लामिक स्टेटचा सीरियात पाडाव; तरीही धोका कायम

अमेरिकेच्या पाठिंब्यावर लढत असलेल्या कुर्डिश सैनिकांनी इस्लामिक स्टेटचा पाडाव केल्याचा दावा केला आहे.

Image copyright AFP/Getty Images

पण इस्लामिक स्टेटचा वैश्विक धोका मात्र अजून संपलेला नाही. सविस्तर बातमी इथं वाचा.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)