लोकसभा 2019 : मिलिंद देवरा मुंबई काँग्रेसचे नवे अध्यक्ष, या कारणांमुळे संजय निरुपम यांचे पद गेले

@sanjaynirupam Image copyright @sanjaynirupam

मिलिंद देवरा यांच्यावर मुंबईच्या काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा देण्यात आली आहे. सजंय निरुपम यांना पदावरून हटवण्यात आलं आहे. काँग्रेसनं ट्वीट करून त्याची माहिती दिली आहे.

संजय निरुपम यांना वायव्य मंबईतून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या उमेदवारीची देखील लगेचच घोषणा करण्यात आली आहे.

ऐन लोकसभा निवडणुकांच्या काळात काँग्रेसनं हे पाऊल उचललं आहे.

संजय निरुपम यांच्या कार्यपद्धतीवर मंबई काँग्रेसच्या नेत्यांनी याआधी नाराजी व्यक्त केली होती.

संजय निरूपम यांचा अध्यक्ष पदाचा कार्यकाळ वेगवेगळ्या कारणांमुळे वादग्रस्त ठरला. त्यांना हटवण्यामागे काही कारणं आहेत. असं राजकीय विश्लेषकांना वाटतं.

  • संजय निरूपम हे इतर नेत्यांना विश्वासात न घेता काम करत असल्याचा आक्षेप मिलिंद देवरां यांच्या गटाच्या काही लोकांनी केला होता.
  • संजय निरूपम विरूध्द कृपाशंकर सिंग, गुरूदास कामत , मिलिंद देवरा हे तीन गट मंबई काँग्रेसमध्ये तयार झाले होते.
  • संजय निरूपम हे अंतर्गत गटबाजी करत असल्याच्या तक्रारी मिलिंद देवरा गटाने अनेकदा राहुल गांधीकडे केल्या होत्या.
  • अंतर्गत गटबाजीमुळे प्रिया दत्त आणि मिलिंद देवरा यांनी निवडणूक लढवण्यास असमर्थता दर्शवली होती.
  • गुरूदास कामत यांच्या निधनानंतर उत्तर मुंबई ऐवजी वायव्य मुंबईमधून उमेदवारी द्यावी अशी मागणी संजय निरुपम यांनी पक्षाकडे केली होती.
  • निरुपम यांना वायव्य मुंबईमधून उमेदवारी मिळू नये यासाठी इतर गटांकडून दबाव आणण्यात आला होता.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)