नीरव मोदींच्या संग्रहातील ऐतिहासिक कलाकृतींचा लिलाव होणार

पेटिंग Image copyright SAFFRONART
प्रतिमा मथळा १९व्या शतकातील महान भारतीय चित्रकार राजा रविवर्मा यांनी साकारलेल्या एका दुर्मिळ चित्रावर या लिलावात कोट्यवधींची बोली लागू शकते, असा अंदाज आहे. ‘त्रावणकोरचे महाराज आणि त्यांचे छोटे बंधू बकिंगहमचे तिसरे ड्यूक आणि मद्रासचे गव्हर्नर जनरल रिचर्ड टेंपल ग्रेनविल यांचं स्वागत करताना’चं हे चित्र १२ ते १८ कोटी रुपयांना विकलं जाऊ शकतं असा अंदाज लिलावकर्त्यांनी व्यक्त केला आहे. १८८१ मध्ये चितारण्यात आलेल्या या चित्राची राष्ट्रीय संपदा म्हणून दर्जा मिळालेल्या चित्रांत गणना केली जाते.

पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्याप्रकरणी अटक झालेले हिरे व्यापारी नीरव मोदी यांच्या संग्रहातील करोडो रुपये किमतीच्या चित्रांचा आज मुंबईत लिलाव होणार आहे.

यामध्ये राजा रविवर्मा आणि वासुदेव गायतोंडे यांच्यासह अनेक दिग्गज भारतीय चित्रकारांच्या कलाकृतींचा समावेश आहे.

नीरव मोदीना जवळजवळ 13,000 कोटी रुपयांच्या गेल्या आठवड्यात लंडनमध्ये अटक करण्यात आली असून, त्यांच्या प्रत्यार्पणाचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्या वर्षी जानेवारीत हा घोटाळा समोर आल्यानंतर नीरव मोदी यांनी लंडनला पलायन केलं होतं.

Image copyright SAFFRONART
प्रतिमा मथळा भारताचे आणखी एक दिग्गज चित्रकार फ्रान्सिस न्यूटन सूझा यांनी १९७४ साली चितारलेलं 'सिटिस्केप' हे चित्रही ८० लाख ते १ कोटी रुपयांना विकलं जाऊ शकतं

त्यानंतर प्राप्तीकर विभागानं नीरव मोदींची मालमत्ता जप्त केली होती ज्यात जवळपास १७०हून अधिक महागड्या पेंटिंग्जचा समावेश होता.

Image copyright SAFFRONART
प्रतिमा मथळा अमूर्त शैलीत भारताचा ठसा उमटवणारे महान चित्रकार वासुदेव गायतोंडे यांनी १९७३ साली चितारलेलं एक अनाम तैलचित्रही या लिलावाचं प्रमुख आकर्षण ठरू शकतं. त्यां कलाविश्वात गायतोंडे या नावाचं तयार झालेलं गूढ पाहता त्यांच्या चित्रांना नेहमीच चढ्या भावानं बोली लागते. २०१५ साली गायतोंडे यांचं आणखी एक अनाम चित्र ३० कोटी रुपयांना विकलं गेलं होतं. कोणत्याही भारतीय चित्रकारानं रेखाटलेलं ते सर्वात महागडं चित्र ठरलं होतं.

या चित्रांची किंमत ५५ कोटींच्या घरात जाते असा जाणकारांचा अंदाज आहे. त्या चित्रांचा लिलाव करून नीरव मोदींनी करात बुडवलेला पैसा वसूल करण्यास मुंबईतील विशेष न्यायालयानं गेल्या आठवड्यात अंमलबजावणी संचलनालयाला परवानगी दिली.

Image copyright SAFFRONART
प्रतिमा मथळा या लिलावात अकबर पदमसी यांचं १९६० सालचं 'ग्रे न्यूड' हे चित्र किमान दीड ते दोन कोटी रुपयांना विकलं जाईल अशी अपेक्षा आहे.

त्यानंतर आता त्यातील ६८ चित्रांचा मुंबईत प्राप्तीकर खात्यातर्फे सॅफ्रनआर्ट या संस्थेच्या माध्यमातून लिलाव केला जाणार आहे. त्यात भारतीय चित्रकारितेत मोलाचं योगदान देणाऱ्या चित्रकारांच्या दुर्मिळ कलाकृतींचा समावेश आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)