काँग्रेसमध्ये इनकमिंग आऊटगोईंग नवं नाही आता फक्त स्पीड वाढला - राजीव सातव :बीबीसी मराठी राऊंड अप

राजीव सातव

बीबीसी मराठीवर प्रकाशित झालेल्या पाच महत्त्वाच्या बातम्या खालीलप्रमाणे:

1. काँग्रेसमध्ये इनकमिंग आऊटगोईंग नवं नाही आता फक्त स्पीड वाढला - राजीव सातव

"राजकीय पक्षातून नेत्यांचं येणं-जाणं नवीन नाही, पण अलिकडे त्याचा स्पीड जरा जास्त वाढलंय," असं म्हणत काँग्रेस खासदार आणि गुजरातचे प्रभारी राजीव सातव यांनी काँग्रेसमधून होणाऱ्या आऊटगोईंगवर पक्षाचा बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे.

नवी दिल्लीत बीबीसी मराठीशी ते बोलत होते. आपण केवळ पक्षाचं काम करण्यासाठी आणि नरेंद्र मोदींचं होम पिच असलेल्या गुजरातमध्ये टक्कर देण्यासाठी उमेदवार म्हणून निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे, असंही त्यांनी म्हटलं. ही मुलाखत सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

2. राहुल गांधींची गरिबांना वर्षाला 72 हजार देण्याची योजना खरंच गरिबी हटवू शकेल?

राहुल गांधी यांनी देशातील सर्वांत गरीब 20 टक्के लोकांना दरवर्षी 72 हजार रूपयांची मदत करण्याची योजना जाहीर केली आहे. या योजनेतून देशातील 5 कोटी कुटुंबांना म्हणजेच 25 कोटी लोकांना फायदा होईल असा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे.

Image copyright Getty Images

निवडणुकीच्या तोंडावर ही घोषणा करण्यात आली असली तरी अशाप्रकारच्या योजनांचा आपल्या देशात मोठा इतिहास आहे. गरिबी हटाव, रोजगार हमी योजना, मनरेगा, राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना वेळोवेळी जाहीर करण्यात आल्या आहेत.

ही संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

3.औरंगाबादमध्ये विरोधकांची फूट खासदार चंद्रकांत खैरेंच्या पथ्यावर?

औरंगाबादमध्ये चंद्रकात खैरे सलग चारवेळा निवडून आले आहेत. काँग्रेसतर्फे सुभाष झांबड यांना उमेदवारी देण्यात आल्याने अब्दुल सत्तार यांनी बंड केलं आहे. काय आहे नेमका मुद्दा?

औरंगाबादचे सिल्लोड, फुलंब्री आणि पैठणवगळता उर्वरित तालुके आणि शहर असा मतदारसंघ आहे. गेल्या चार टर्मपासून शिवसेनेचे चंद्रकांत खैरे या मतदारसंघातून निवडून येत आहेत.

Image copyright facebook

त्यांनी 1999, 2004, 2009 आणि 2014 मध्ये विजय मिळवला होता. 1999 मध्ये त्यांनी बॅरिस्टर अंतुले यांना, 2004 मध्ये रामकृष्ण बाबा पाटील यांना. 2009 मध्ये उत्तमसिंह पवार आणि पाच वर्षांपूर्वी नितीन पाटील यांचा पराभव केला होता. हे सर्व काँग्रेसचे उमेदवार होते. ही ही संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

4. मिलिंद देवरा मुंबई काँग्रेसचे नवे अध्यक्ष, या कारणांमुळे संजय निरुपम यांचे पद गेले

मिलिंद देवरा यांच्यावर मुंबईच्या काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा देण्यात आली आहे. सजंय निरुपम यांना पदावरून हटवण्यात आलं आहे. काँग्रेसनं ट्वीट करून त्याची माहिती दिली आहे.

Image copyright Sanjay Nirupam

संजय निरुपम यांना वायव्य मंबईतून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या उमेदवारीची देखील लगेचच घोषणा करण्यात आली आहे. ऐन लोकसभा निवडणुकांच्या काळात काँग्रेसनं हे पाऊल उचललं आहे.

ही संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

5. ऑस्ट्रेलियातील विद्यापीठांमध्ये आशियातील विद्यार्थ्यांचा लैंगिक छळ

रिया सिंग (नावाने बदललं आहे) सिडनीच्या सेंट्रल स्टेशन ते विद्यापीठ असा प्रवास करत होती. बसमध्ये चढताच एक पुरुष कर्मचारी तिला खेटून उभा राहिला आणि तिच्याशी लगट करू लागला.

Image copyright Getty Images

हा प्रकार 2017ला घडला. ऑस्ट्रेलियाच्या मानवी हक्क आयोगाचा (AHRC) Change The Course : National Report on Sexual Assault and Sexual Harassment at Australian Universities हा अहवाल येण्यापूर्वीची ही घटना आहे. ही संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)