मुंबईच्या वाढलेल्या तापमानाबाबत जाणून घ्यावे असे 9 मुद्दे

वातावरणातली उष्णता Image copyright Getty Images

मुंबईत सध्या तापमान वाढलेले आहे. मुंबईतील चढं तापमान ही काही नवी बाब नसली तरी अचानक वाढलेल्या तापमानाने मुंबईकर हैराण झाले आहेत. मुंबईत सध्या जी उष्णतेची लाट आली आहे, त्याबद्दल काही गोष्टी मात्र समजून घेण्यासारख्या आहेत.

22 मार्चला मुंबईतील तापमान 31.5 डिग्री इतकं होतं. पण पुढील काही दिवसांत त्यात कमालीची वाढ झाली. 25 मार्चला या तापमानात 9 डिग्रीची वाढ होत ते 40.3 डिग्रीपर्यंत गेलं होतं.

स्कायमेट या हवामान संदर्भातील सेवा पुरवणाऱ्या संस्थेने मुंबईतील सध्याच्या हवामानासंदर्भात खालील माहिती दिली आहे.

1. 25 मार्चला सांताक्रुझ वेधशाळेत कमाल तापमान 40 डिग्री सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. गेल्या 11 वर्षांत 40 डिग्री सेल्सिअस तापमान जाण्याची मुंबईतील ही पाचवी वेळ आहे.

2. 26 मार्च 2018 ला 41 डिग्री, 8 मार्च 2013ला 40.5 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. 28 मार्च 1956ला तापमान 41.7 डिग्री सेल्सिअसपर्यंत गेलं होतं, ते मार्च महिन्यातील मुंबईतील सर्वाधिक तापमान होतं.

3. ईशान्य दिशेकडून येणाऱ्या कोरड्या आणि तापलेल्या हवेमुळे तापमानातील ही वाढ झालेली आहे. त्यामुळेच 26 मार्चलाही तापमान जास्त राहिलं होतं.

4. पण हवेची दिशा बदलल्याने बुधवारी तापमानात घट होणं अपेक्षित आहे.

5. वायव्य दिशेकडून अरबी समुद्रावरून येणारी थंड हवा ईशान्य दिशेकडून येणाऱ्या हवेची जागा घेईल त्यामुळे मुंबईतील तापमानात घट होणं अपेक्षित आहे.

Image copyright Getty Images

6. मुंबईतील तापमान 34 डिग्री सेल्सिअस इतकं कमी येऊ शकतं, असं स्कायमेटनं म्हटलं आहे. पण आर्द्रता मुंबईत जास्त असेल, असंही म्हटलं आहे.

8. हवामान खात्याच्या पुणे विभागाने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली होती, असं म्हटलं आहे.

9. 25 मार्चला राज्यातील सर्वांत जास्त तापमान अमरावती इथं नोंदवलं गेलं. ते तापमान 41.6 डिग्री इतकं होतं.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)